वालावल : ग्रामपंचायत वालावल समता नगर येथे अनुसूचित जाती निधी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या लघुनळ योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण होत असलेल्या या कामाचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संदेश नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी जिप माजी अध्यक्ष संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, महिला तालुकाप्रमुख रचना नेरुरकर, सरपंच राजेश प्रभु, उपसरपंच -सौ साक्षी कवठणकर, सदस्या -यशश्री वालावलकर, शुभदा कुडेंकर,
महीला पदाधिकारी अर्चना रेडकर, अमिता मेस्त्री, सुवर्णा देसाई, संदेश मठकर,आनंद चौधरी, नितिन आडेकर, चंद्रकांत वालावलकर, राजेश वालावलकर, समिर वालावलकर, योगेश वालावलकर, राजु वालावलकर, अनंत वालावलकर, विष्णु वालावलकर, दत्ताराम वालावलकर, रामचंद्र वालावलकर, सुरेश वालावलकर, दिपीका वालावलकर, गितांजली वालावलकर, वैशाली वालावलकर, राजश्री वालावलकर, दर्शना वालावलकर आदी उपस्थितीत होते.
▪️शानू वालावलकर | प्रतिनिधी स्काय न्युज टुडे

