Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शहिदी समागमच्या ३५० व्या वर्षानिमित्त - नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणार भव्य कार्यक्रम

शहिदी समागमच्या ३५० व्या वर्षानिमित्त - नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणार भव्य कार्यक्रम

सिंधुदुर्ग : शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन असे नऊ समाज-संप्रदाय नांदेड या ठिकाणी एकत्र येणार आहेत.श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेडला सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे .या कार्यक्रमाच्या निमित्ताने अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी श्री गुरु तेग बहादूर यांना आपल्या संदेशाद्वारे अभिवादन करत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या व्हिडिओ संदेशामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या,श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभरामध्ये हिंद की चादर हा कार्यक्रम केला जात आहे.श्री गुरु तेग बहादूर साहेब यांचा संदेश तळागाळापर्यन्त पोहोचवावा,या उद्देशाने महाराष्ट्रामध्येही नांदेड,नवी मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम होत आहे.श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिले.धर्मांतर सक्तीला शरण न जाता त्यांनी जीवनदान केले. गुरु तेग बहादूर यांनी अनंतपूरसाहेब सारखे पवित्र तीर्थस्थळ निर्माण केले. त्यांची एकच शिकवण होती की राष्ट्र मोठे आहे आणि प्रत्येकाने आपले कर्तव्य करताना शांतीचा संदेश दिला पाहिजे.हा संदेश त्यांनी जगभरामध्ये पोहोचविला .तर अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागाचे सचिव रुचेश जयवंशी म्हणाले, गुरू तेग बहादूर हे शिख समाजाचे नववे धर्मगुरू आहेत. त्यांनी मानव अधिकार सुरक्षेचे कार्य केले.ते फक्त शिख समाजाचे गुरू नसून त्यांनी वेगवेगळ्या समाजाला एकत्र आणण्याचे काम केले.हिंद की चादर - गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फतही राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गुरु तेग बहादूर यांचे महाराष्ट्राशी असलेले अतूट नाते या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर येणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांनी पुढे येऊन मनापासून या कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि श्री गुरु तेग बहादूर यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा आदर करावा .राज्य आणि नांदेड नागपूर व नवी मुंबई जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांची सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे .

rapan bottom