रांगोळी महाराज मठ मार्गांवरील धोकादायक खड्डा नागरिकांच्या मदतीने बुजवला
मालवण : शिवसेनेच्या मालवण शहरातील प्रभाग ४ च्या नगरसेविका सौ. पूनम चव्हाण यांची तत्परता पुन्हा एकदा दिसून आली आहे. भरड वायरी मार्गावर रांगोळी महाराज मठ याठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला. अपघातास कारणीभूत ठरणारा हा धोकादायक खड्डा नगरसेविका सौ. पुनम चव्हाण यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुजवून सदरचा रस्ता वाहतुकीला सुरळीत करून दिला. या कामात अमित सावंत, उमेश जाधव, नागेश चव्हाण, अभिजित, तुषार लुडबे, अपर्णा सावंत यांनीही मोलाचे सहकार्य केले. याबद्दल पूनम चव्हाण व नागरिकांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले आहे.


