शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश
मालवण | प्रतिनिधी : उबाठा गटाच्या नांदोस ग्रामपंचायत सदस्या गौरी पारकर तसेच त्यांचे पती गणेश पारकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. गावागावात अनेक विकास कामे मंजूर झाली आहेत. याच विकास कार्यावर प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. नांदोस गावातील विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आले होते त्यावेळी हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

