मालवण | प्रतिनिधी : ग्रामपंचायत कुंभारमाठ अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सरपंच पुनम वाटेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शासनाच्या तसेच ग्रामनिधीतून मंजूर झालेल्या तंत्रनिकेतन रस्ता ते निकम घर रस्ता खडीकरण डांबरीकरण जनसुविधा, ब्राम्हणदेव मंदिर पायवाट पेव्हर ब्लॉक बसविणे ग्रामनिधी, ग्रामपंचायत स्वच्छतागृह पुनर्दुरुस्ती १५ वा वित्त आयोग या विकासकामांचे भूमिपूजन. तसेच गावठेवाडी घाटी पायवाट कॉंक्रिटीकरण ग्रामनिधी, कुंभारवाडी निगवेकर चव्हाटा भुयारी गटार १५ वा वित्त आयोग, अवघड वळणांवरील मीरर, सुरक्षेच्या दृष्टीने गावात विविध ठिकाणी बसविण्यात आलेले CCTV, कातकरी आदिवासी वस्तीवर बसविण्यात आलेले सौर पथदिप, गावात स्वच्छता राखण्यासाठी बसविण्यात आलेले सुचना फलक, या कामांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी १५ वा वित्त आयोग अंतर्गत वैयक्तिक लाभासाठी ग्रामस्थांना वाटप करण्याकरिता खरेदी करण्यात आलेले ज्युट बॅग, केरसुणी, सुपली इत्यादी साहित्य वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम,
ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर, प्रसाद नेरुरकर, सौ. प्रिया गोवेकर, सौ. सोनाली डिचवलकर, सौ. अनिता गावकर, माजी उपसभापती मधुकर चव्हाण, पोलीस पाटील विठ्ठल बावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात सोयीसुविधा वाढून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

