Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा मार्गांवर सौर पथदिव्यांची झळाळी

दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा मार्गांवर सौर पथदिव्यांची झळाळी

स्थानिकांची मागणी अखेर पुर्ण : नगरसेविका अन्वेषा आचरेकर, माजी नगरसेविका सेजल परब, सन्मेष परब यांचा यशस्वी पाठपुरावा

मालवण | प्रतिनिधी : मालवण दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा या मार्गांवर मालवण नगरपालिकेतील भाजपा गटनेत्या नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर, माजी नगरसेविका सौ. सेजल परब तसेच भाजप उपतालुकाध्यक्ष सन्मेष परब यांच्या पाठपुराव्यातून खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून १९ सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत.

गेली अनेक वर्षे अंधारात असणारा हा रस्ता प्रकाशमान झाला आहे. श्री देव दांडेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने हे काम पूर्णत्वास नेण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

दांडेश्वर मंदिर ते दांडी शाळा या रस्त्यावर पथ दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अंधारमय रस्त्यावरून नागरिकांना ये - जा करावी लागत असल्याने गैरसोय होत होती. पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रस्ता महत्वाचा ठरत असल्याने या मार्गावर पथ दिवे लावावेत अशी मागणी दांडी होत होती. या मार्गावर सौर पथदिवे लावण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. या सौर पथदिव्यांचे लोकार्पण स्थानिक नागरिक गिरीधर आचरेकर व शरद आगवणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. सेजल परब, सन्मेष परब आदी तसेच दांडी येथील नागरिक उपस्थित होते.

rapan bottom