Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिवसेना महिला आघाडी आयोजित पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे विजेत्या

शिवसेना महिला आघाडी आयोजित पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे विजेत्या

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य

संगीता तायशेटे द्वितीय तर सुचित्रा सावंत तृतीय : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयात शहरातील महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत रोहिणी तायशेटे या विजेत्या ठरल्या. संगीता तायशेटे यांना द्वितीय तर सुचित्रा सावंत यांना तृतीय क्रमांक मिळाला.

स्पर्धेतील विजेत्यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सामंत यांनी महिलांसाठी आयोजित या स्पर्धेचे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.

तांदळापासून पौष्टिक पदार्थ बनविणे या संकल्पनेवर आधारित असलेल्या या स्पर्धेत शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसादात सहभाग नोंदवत विविध रुचकर आणि आरोग्यदायी पदार्थ सादर केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत महिलांनी आपल्या कल्पकतेने तांदळाचे विविध प्रकार बनवले होते. परीक्षकांनी चव, सादरीकरण आणि पौष्टिक मूल्य या निकषांवर विजेत्यांची निवड केली. स्पर्धेचे परीक्षण स्मृती कांदळकर, विनय गावकर यांनी केले.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा ममता वराडकर, शिवसेना शहर प्रमुख गटनेत्या नगरसेविका पूनम चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, अश्विनी कांदळकर, स्वप्नाली नेरुरकर, रश्मी तुळसकर, मधुरा तुळसकर आणि प्रमिला मोरजे, दर्शना सादये, कृतिका हुले, अपर्णा सावंत, स्मिता प्रभाळे, मंदा जोशी, पूजा खडपकर, लुड्डीन फर्नांडिस, प्रियांका मेस्त्री, नंदिता वरावडेकर, मार्टिन फर्नांडिस, रोहिणी तायशेटे, सान्वी शिर्सेकर, शीला शेवाळे, अंकिता मेस्त्री, चित्रा हरमलकर, संजना सामंत पूजा चव्हाण, विद्या फर्नांडिस, स्मिता सिंह, कविता मोंडकर, विद्या खानोलकर, संगीता मुंबरकर यांच्यासह अन्य शिवसेना महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला स्पर्धक उपस्थित होत्या.

अमित खोत, मालवण

rapan bottom