मालवण : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम मालवण, कणकवली, देवगड येथील काही जिल्हा परिषद शाळा तसेच सांडवे हायस्कूल, प्राथमिक शाळा कणकवली परमहंस भालचंद्र महाराज जि प शाळा क्र ३ गोठणे सडेवाडी, जिल्हा परिषद शाळा निरोम, जिल्हा परिषद शाळा मठबु, जिल्हा परिषद शाळा क्र३ मठबु, जिल्हा परीषद शाळा क्र१मठबु, जिल्हा परिषद शाळा क्र३ मठबु शाळा पाणललोस, जिल्हा परिषद शाळा बुधवळे येथे सर्व विद्यार्थ्यांना शिवसेना तालुका प्रवक्ते निलेश बाईत यांच्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आले.

तसेच परमपुज्य भालचंद्र महाराज मठ कणकवली येथे अभिषेक करून वाढदिवसा निमित्त प्रार्थणा करण्यात आली. यावेळी मठबु गावचे सामाजिक कार्यकर्ते अमित मेस्त्री यांनी मोलाचे सहकार्य केले. गोठणे येथील बाबु परब. राजू जगताप संतोष धुरी संतोष घाडी यांनी ही मोलाचे सहकार्य केले.
ओवळीये गावात बबन परब यांनी शिवसेना शाखेच्या वतीने मुलांना जिलेबी वाटप केले. तसेच मंगेश यादव यांनी आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरण निमीत्त सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.
शिवसेना तालूकाप्रमुख विनायक बाईत यांच्या माध्यमातून ही विविध सामाजिक उपक्रम विविध ठिकाणी राबवण्यात आले.

