Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवण नगरपरिषदेद्वारे रात्री कचरा संकलन मोहिम

मालवण नगरपरिषदेद्वारे रात्री कचरा संकलन मोहिम

मालवण : मालवण पर्यटन शहर असल्यामुळे शहरात वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देतात त्यामुळे येथे कचरा तयार होण्याचे प्रमाणही जास्त आहे. पर्यटन शहर असल्यामुळे स्वच्छतेची विशेष गरज लक्षात घेता तसेच व्यापाऱ्यांच्या व हॉटेल व्यावसायिकांच्या सोयीच्या दृष्टीने मालवण बाजारपेठ तसेच शहराच्या काही महत्वाच्या भागात नगर पालिकेद्वारे रात्रीही कचरा संकलनास सुरुवात करण्यात आलेली आहे.

शहराच्या काही महत्वाच्या भागात तसेच समुद्र किनारी उघड्यावर कचरा फेकला जात असल्याचे निदर्शनास आल्याने नगरपरिषदेने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. शहरातील बाजारपेठ पुढे फोवकांडा पिंपळ पासून rock garden व चीवला समुद्र किनारा याभागात रात्रीचे कचरा संकलन सूरु करण्यात आलेले आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार कचरा उघड्यावर फेकणे गुन्हा असून; कचरा उघड्यावर फेकल्यामुळे त्याभागात दुर्गंधी पसरून सदर ठिकाणाचे विद्रुपीकरण होते तसेच यामुळे नागरिकांना व प्राण्यांनाही आरोग्याचा धोका उद्भवतो. नागरिकांवर होणारे अस्वच्छतेचे दुष्परिणाम व शहराच्या नैसर्गिक सौंदर्यावर होणारे परिणाम लक्षात घेता सर्वांनी आपला तयार होणारा कचरा उघड्यावर नफेकता नगरपरिषदेच्या घंटा गाडीतच देणे आवश्यक आहे.
मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी रात्रीच्या कचरा संकलनासह याभागात दिवसाही कचरा संकलन चालू ठेवले जाणार असल्याचे सांगून मालवण हे पर्यटन शहर असून येथील पर्यटन वाढीसाठी स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आणि यासाठी सर्व नागरिक व व्यावसायिक यांचेही योगदान महत्वाचे असून शहराच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले.

rapan bottom