शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा. दत्ताजी सामंत वाढदिवस अभिष्टचिंतन..!


राणे साहेबांचा परिसस्पर्श होऊन घडलेले 'सोनेरी व्यक्तीमत्व' अर्थात कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व यांचा अखंडित वाहणारा झरा….. सर्वसामान्यांसाठी आधारवड ठरणारे सिंधुदुर्गातील एक दातृत्व…. दत्ता सामंत हे होय…! राणे साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता हीच ओळख अभिमानाने मिरवणारे दत्ता सामंत निश्चितच राजकीय व सामाजिक पटलावर 'आदर्श' ठरतात. निसर्गसंपन्न घुमडे गावचे सुपुत्र असलेले दत्ताजी सामंत हे नाव त्याच्या दातृत्वासाठी जेवढे परिचित आहे, तेवढेच सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर एक झंझावाती वादळ म्हणून परिचित आहे. यशस्वी उदोजक म्हणूनही नावलौकक प्राप्त असे हे व्यक्तिमत्व राणे साहेबांच्या मार्गदर्शनात तसेच आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात राजकीय आणि सामाजिक पटलावर यशस्वी आणि आदर्शवत वाटचाल करतं आहे. आज त्यांचा 57 वा वाढदिवस….

काही माणसे जन्माला येतातच ती समाजसेवेसाठी. यांच्याकडे स्वार्थ नसतो, असतो फक्त सेवाभाव. म्हणूनच अशी माणसे आपले अढळ स्थान जनतेच्या हृदयात निर्माण करतात.


प्रचंड मेहनत आणि अभ्यासू वृत्ती या बळावर दत्ता सामंत यांनी यशाला गवसाणी घातली. सामाजिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील त्यांची यशस्वी वाटचाल अनेकांना प्रेरणा देणारी आहे. दत्ता सामंत यांचे सर्वच क्षेत्रात बहुमोल योगदान नेहमीच राहिले. धार्मिक कार्यातही ते नेहमीच पुढे असतात. अनेक मंदिरांचे स्वखर्चाने केलेले जीर्णोद्धार अन भजनकलेतून केलेली ईश्वरसेवा दत्ताजी यांची धार्मिकता व कलेची आवड स्पष्ट करते. दशावतार व अन्य कला क्षेत्रातही त्यांचे योगदान बहुमोल राहिले आहे.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून दत्ताजी सामंत यांनी सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावर इमाने इतबारे काम केले, करत आहेत. राणे साहेबांच्या आदेशाने कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यात, निवडणुकीची रणनीती आखण्यात आणि विरोधकांचे चक्रव्यूह भेदून विजयाची पताका फडकवण्यात दत्ता सामंत यांचा हातखंडा राहिला. आताही आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषद निवडणुकीत दत्ता सामंत यांचा करिष्मा दिसून आला. म्हणूनच 'दत्ता तिथे सत्ता' आणि 'किंगमेकर' हा सहकाऱ्यांनी दिलेला बहुमान त्यांना सार्थ ठरतो.




राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करतं असताना अनेकांना सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिप व पस सदस्य ते सभापती, अध्यक्ष बनवण्यात यशस्वी जबाबदारी पार पाडणारे दत्ताजी सामंत अनेकांच्या हृदयात आपले आढळ स्थान कायम ठेवतात.



राजकारण, उद्योग व्यवसाय यात सतत व्यस्त असणाऱ्या दत्ता सामंत यांच्यातील समाजकार्याचा झरा अखंडपणे वाहत असतो. सर्वसामान्य गोरगरीब जनतेला केलेल्या मदतीचा आलेख सतत उंचावणारा असला तरी यांची नोंद दिलेल्या राणे साहेब यांच्या प्रमाणे दत्ता सामंत यांच्या हातानी कधी ठेवली नाही. हाच दत्ता सामंत यांचा दिलदारपणा आणि मनाचा मोठेपणा आहे. मदत ही मदत असली पाहिजे तिचा गाजावाजा न करता लाखोंचे दान करणाऱ्या दत्ता सामंत यांची हीच सेवाभावी वृत्ती अनेकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारी ठरते.



विध्यार्थ्यांना मदतीचा हात असो अथवा आधुनिक शिक्षणासाठी शाळा डिजिटल असो. दत्ताजी अग्रेसर राहिले. आजारी व्यक्तींना मदत अथवा अपघातग्रस्तांना आधार यासाठी सामंत देवदूत ठरले. गरजवंत कधीही रिकामी हातांनी त्यांच्या समोरून माघारी परतला नाही.

अनेक ग्रामीण भागात, जनता व कार्यकर्त्यांशी त्यांची कनेक्टिव्हिटी कायम जोडलेली आहे. राणे साहेबांचे आशिर्वाद कायम घेऊन सदैव कार्यकर्ता ही त्यांची भावना सर्वकाही सांगून जाते.

वर्षभरापूर्वी राणे साहेबांचा आशीर्वाद घेऊन दत्ताजी सामंत शिवसेनेत प्रवेशकर्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. त्या नंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे साहेबांच्या विजयात दत्ता सामंत यांचे योगदान मोठे होते. आमदार निलेश राणे साहेबांनीही याचा विशेष उल्लेख अनेक ठिकाणी केला. तर दत्ता सामंत सांगतात माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे निलेश राणे साहेब आमदार झाले तोच राहील.














दत्ताजी सामंत आपला जिवनप्रवास यशाची शिखरे असाच सर करणारा राहो. सामाजिक, राजकीय व उदोग क्षेत्रातील तुमची वाटचाल यापुढेही यशस्वीपणे बहरत राहो. सर्वसामान्यांची सेवा तुमच्या हातून नित्यघडो. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो. वाढदिवस अभिष्टचिंतन….!
▪️शब्दांकन :-अमित खोत

