Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती

आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती

२९ वर्ष प्रतीक्षेत असलेल्या धामापूर पेंडूर मोगरणे रस्त्याचा प्रश्न निकाली

मालवण | प्रतिनिधी : धामापूर गावातील ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठाने असलेला मोगरणेवाडी, फोपळेवाडी या वाडयांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यातील काही भाग हा संरक्षित वनविभागाच्या क्षेत्रातून जातो. सन १९९७ मध्ये माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यानंतर वनविभागाची परवानगी मिळत नसल्याने त्या वनविभागाच्या हद्दीतील सुमारे ९०० मीटर रस्ता वगळून इतर रस्त्याची वारंवार डागडुजी तसेच खडीकरण डांबरीकरण करण्यात आले. परंतु गेल्या २९ वर्षात या रस्त्याची मात्र कोणतीही डागडुजी परवानगी अभावी रखडल्यामुळे रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली होती.

दरम्यान मोगरणेवाडी, फोपळेवाडी यासह इतर वाड्यांमधील रहिवाशांना ग्रामपंचायत कामकाज, बाजार, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा या सर्व कामांसाठी याच रस्त्याचा पर्याय असल्याने त्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे वनविभाग क्षेत्रातील हा रस्ता सुस्थितीत व्हावा अशी बऱ्याच वर्षांची मागणी होती.

दरम्यान जिथे विषय गंभीर तिथे आमदार निलेश राणे खंबीर याचा प्रत्यय धामापूर वासियांना अनुभवण्यास मिळाला. धामापूर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच मानसी परब सर्व सदस्य आणि महेश परब यांच्या प्रयत्नांची दखल शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली व सातत्याने पाठपुरावा करून अशक्य वाटणारी परवानगी वनविभागाकडून मिळवून या ९०० मीटर रस्त्याच्या डागडुजीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १६ लाख रुपये निधी सुद्धा मंजूर करून दिला. आणि आता वनविभागाच्या माध्यमातून या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तसेच या कामी स्यमंतक संस्थेचे सचिन देसाई यांचेही सहकार्य लाभले असे सरपंच मानसी परब यांनी सांगितले.

तब्बल २९ वर्षानंतर पुन्हा डागडुजी करण्यासाठी मान्यता मिळालेल्या धामापूर मोगरणे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवार दि. ४ जानेवारी रोजी माजी जि. प. सदस्य संतोष साटविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धामापूर सरपंच मानसी परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी कुडाळ वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मालवण वनपाल सदानंद परब, वनरक्षक अतुल खोत, लक्ष्मण आमले, ठेकेदार अरविंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता फोपळे, प्रशांत गावडे, स्वप्नील नाईक, सामाजिक कार्यकर्ते महेश परब राजन माणगावकर, ग्रामस्थ आनंद तोरसकर, अमोल परब, दिनेश ठाकूर, बाळकृष्ण निकम, अविनाश निकम, रामचंद्र गावडे, निलेश गावडे, सिद्धेश फोपळे, सिद्धेश पाताडे, सुंदर पोफळे, गणेश फोपळे, रामचंद्र फोपळे, भरत फोपळे, प्रकाश साडवेलकर, राजाराम आमरे, रघुनाथ धनावडे, रमेश महाजन, भाई सावंत, अशोक शृंगारे, वर्षा सुतार, प्रवीण परब, एकनाथ परब, सुभाष धामापूरकर, दीपक झोरे, प्रकाश झोरे आदी उपस्थित होते.

वनविभाग हद्दीतील सदर रस्ता मुरूम दगड आणि माती वापरून सपाटीकरण आणि मजबुतीकरण करून सुसज्ज करण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल संदिप कुंभार यांनी यावेळी सांगितले. यावेळी धामापूर मोगरणे रस्ता मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सरपंच मानसी परब यांनी आभार मानले.

rapan bottom