Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

देवगड–जामसंडे शहराच्या विकासाला मिळणार गती

देवगड–जामसंडे शहराच्या विकासाला मिळणार गती


पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण संपन्न

सिंधुदुर्गनगरी :- देवगड–जामसंडे नगरपंचायती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या विकासकामांमध्ये कुडाळवाडी, देवगड व वैभववाडी येथील शहरी भागांमधील पर्यटन स्थळांवर ई-टॉयलेटची उभारणी, निर्मिती पीपल्स अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी, सुनिधी आश्रय फाउंडेशन यांच्या माध्यमातून भटक्या श्वानांचे निर्बंधीकरण व अँटी-रेबीज लसीकरण मोहीम, तसेच नगरपंचायत क्षेत्रातील घनकचरा संकलन व वाहतुकीसाठी वाहन व ट्रॅक्टर-ट्रॉलीची खरेदी यांचा समावेश आहे.


या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार अजित गोगटे, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील ,स्वच्छता सभापती बुवा तारी, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, पाणीपुरवठा सभापती तनवी चांदोस्कर, तसेच सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, देवगड–जामसंडे नगरपंचायत सुंदर, स्वच्छ आणि आदर्श शहर बनवण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत सातत्याने दिली जाईल.
स्वच्छता, नागरी सुविधा आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने हे प्रकल्प नागरिकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

rapan bottom