Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

कोकणच्या प्रगतीला गगन भरारी - चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

कोकणच्या प्रगतीला गगन भरारी - चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी !

नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटी चा निधी

खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लाभले मोलाचे सहकार्य

चिपी विमानतळाची कार्यक्षमता ही दुपटीने वाढली
मुंबईसह अन्य मोठ्या शहरातून विमानसेवा सुरू होण्यास मार्ग झाला सुखकर

कणकवली:
सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीए ( DCGA ) कडून आयएफआर (IFR) लायसन्स आणि ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्यामुळे, आता या विमानतळावर २४×७, रात्रंदिवस, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळावरील पार्किंगची क्षमता देखील ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे विमानतळाची कार्यक्षमता दुप्पट झाली आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल ११,००० प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला असल्याने सिंधुदुर्ग विमानतळ देशातील ७५ प्रमुख विमानतळांच्या यादीत मानाने स्थान मिळवेल, असा ठाम विश्वास वाटतो. लवकरच मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवाही सुरू होणार असून, या सर्व सोयी-सुविधांमुळे पर्यटनाला अभूतपूर्व चालना मिळेल आणि कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होईल.

नाईट लँडिंगला च्या परवानगी साठी खासदार नारायण राणे,आणि मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे कडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तर चीप विमानतळ येथे नाईट लँडिंग साठी आवश्यक असणारा विद्युत पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हा नियोजन मधून अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे चिपी विमानतळाला आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत झाला आणि पुढील परवानगी मिळण्यास सोईचे ठरले. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातत्याने वेळोवेळी सहकार्य केले केंद्र सरकारशी आणि हवाई उड्डाण मंत्र्यांशी राज्य सरकारकडून जो संवाद आणि पत्रव्यवहार होणे गरजेचे होते तो करण्यात आला. या सर्वच गोष्टींमुळे चिपी विमानतळ नाईट लँडिंग परवानगी मिळण्यास सोईचे ठरले.

rapan bottom