Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

शिवसेना नगराध्यक्षा, नगरसेवकांचा 'श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी' गट स्थापन

शिवसेना नगराध्यक्षा, नगरसेवकांचा 'श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी' गट स्थापन

मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांसह शिवसेना १० नगरसेवकांचा गट

गटनेते पदी नगरसेविका पूनम चव्हाण

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा मालवण नगरपरिषदेवर फडकला. शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांसह १० नगरसेवकांनी एकत्र येत श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी या गटाची स्थापना गटनेत्या नगरसेविका पुनम नागेश चव्हाण यांच्या नेतृत्वात केली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र आणि ठरावाची प्रत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.

नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मालवण नगरपरिषदेमध्ये निवडून आलेल्या शिवसेना सदस्यांनी 'श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी' गट स्थापन केला आहे. गटाच्या गटनेतेपदी पूनम चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.

गटात नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेवक दिपक पाटकर, निना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गावकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर या आहेत. सर्व ११ सदस्यांनी या प्रक्रियेला आपला पाठिंबा दर्शवत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. गट स्थापन केल्याचे पत्र नगरविकास विभाग जिल्हा प्रशासन सहायक विनायक औंधकर यांना सादर करण्यात आले.

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वात मालवण शहाराच्या विकासासाठी आम्ही सर्व कटीबद्ध असल्याचे गटनेत्या पुनाम चव्हाण यांनी सांगितले.

फोटो : मालवण नगरपरिषद शिवसेना नगराध्यक्षा, नगरसेवकांनी 'श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी' गट स्थापन केला. (अमित खोत, मालवण)

rapan bottom