Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मालवण नगरपरिषद भाजप नगरसेवकांचा 'मालवण शहर विकास समिती' गट स्थापन

मालवण नगरपरिषद भाजप नगरसेवकांचा 'मालवण शहर विकास समिती' गट स्थापन

गटनेतेपदी सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांची निवड

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा मालवण शहर विकास समिती या नावाचा गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या गटप्रमुख म्हणून मालवण नगरपालिका प्रभाग ९ च्या नगरसेविका सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आशीर्वादाने तसेच राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री भाजप नेते नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या मार्गदर्शनात मालवण नगरपालिकेमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवक मंदार केणी, सौ. दर्शना कासवकर, सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. महानंदा खानोलकर, आणि ललित चव्हाण यांनी एकत्र येत मालवण शहर विकास समिती या नावाचा अधिकृत गट स्थापन केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी पत्र देण्यात आले असून गट स्थापन करण्याबाबतचा ठराव व त्याबद्दलचे इतिवृत्त सादर करण्यात आले आहे.

मालवण शहर विकास समितीच्या गटनेते पदी सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने गट स्थापन केल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मालवण नगरपालिकेत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी एकत्र येत हा गट स्थापन केला असून यामध्ये नगरसेवक मंदार केणी, सौ. दर्शना कासवकर, सौ. अन्वेषा आचरेकर, सौ. महानंदा खानोलकर, ललित चव्हाण यांचा समावेश आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम व संबंधित नियमानुसार या गटाची अधिकृत नोंद घेण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

rapan bottom