मालवण | प्रतिनिधी :
मालवण नगरपालिकेत विजयी झालेल्या भाजपा नगरसेविका तथा मालवण शहर विकास समितीच्या गटनेत्या सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर, युवा नगरसेवक ललित चव्हाण यांच्या समवेत राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची ओरोस येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान ना. राणे यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बॅंकचे अध्यक्ष श्री मनीष दळवी, किशोर खानोलकर आदी उपस्थित होते
दरम्यान ओरोस येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आलेले मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांचीही भाजपच्या या तिन्ही नगरसेवकांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आम. राणे यांनीही नगरसेवकांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

