नॅशनल सहकारी संस्था मालवण व मालवणी बाजारच्यावतीने आयोजन
मालवण | प्रतिनिधी : नॅशनल सहकारी संस्था मालवण आणि मालवणी बाजार संस्थेचे संस्थापक व कागलच्या राजे करमसिंह घाटगे को-ऑप. बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील व बामणी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. अनुराधा पाटील यांच्या हस्ते मालवणच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर व सहकारी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक दीपक पाटकर, नगरसेविका सौ. पूनम चव्हाण, नीना मुंबरकर, मेघा गावकर, सौ. शर्वरी पाटकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी व्ही. बी. पटकारे, बबन गावकर, सतीश कासले, सुचिता धुरी आदी उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

