Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मच्छीमार्केट मधील समस्या दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करणार : नगराध्यक्षा ममता वराडकर

मच्छीमार्केट मधील समस्या दूर करून आवश्यक सुविधा उपलब्ध करणार : नगराध्यक्षा ममता वराडकर

नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी 'स्पॉट पंचनामा' करत समस्या घेतल्या जाणून

समस्या प्राध्यान्य क्रमाने सोडवण्या बाबत प्रशासनास दिले आदेश

मच्छी विक्रेत्या महिला व अन्य व्यवसायिकांशी नगराध्यक्षानी साधला संवाद

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मच्छीमार्केट मध्ये मत्स्यविक्रेत्या महिला आणि मार्केटमधील अन्य व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यां बाबत नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांनी प्रत्यक्ष भेट देत त्या जाणून घेत तात्काळ सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनास आदेश दिले. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी नगराध्यक्षा वराडकर यांची असलेली तत्परता त्यांच्या कृतीतून जनतेने अनुभवली.

नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांसह मार्केटची पाहणी दरम्यान विक्रेत्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही दिली. दरम्यान मच्छीमार्केट तसेच परिसरातील देखभाल दुरुस्तीची जी कामे तातडीने पुर्ण होतील त्या कामांचा प्रस्ताव तात्काळ सादर करा," अशा सूचना नगराध्यक्षा सौ. वराडकर यांनी प्रशासनाला दिल्या.

नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नगरसेविका शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, मेघा गावकर, नगरसेवक सहदेव बापर्डेकर, निकीत वराडकर, प्रभारी मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, पाणी पुरवठा विभागाचे अमोल काटवळ, स्वच्छता विभागाचे मुकादम आनंद वळंजू, रमेश कोकरे, सुधीर आचरेकर, प्रतीक मालवणकर, मेगल डिसोझा, अनिकेत चव्हाण यांच्यासह भेट देत पाहणी केली.

या पाहणीत प्रामुख्याने मत्स्यविक्रेत्या महिलांच्या बैठक व्यवस्थेतील समस्या समोर आल्या. सध्याची रचना अनेकांना त्रासदायक असल्याने महिलांना मासळी खाली ठेवून विक्री करावी लागते. यामुळे विक्रेत्यांनी बैठक व्यवस्थेत तातडीने बदल करण्याची मागणी केली. तसेच मंडईतील स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून महिला विक्रेत्यांचे प्रचंड हाल होत आहेत. याची दखल घेत नगराध्यक्षांनी तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

मटण व चिकन विक्रेत्यांच्या गाळ्यांजवळील विजेचे डीपी पूर्णतः उघड्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. शॉर्टसर्किट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने हा भाग तातडीने बंदिस्त करून तिथे स्वतंत्र दरवाजा बसविण्याच्या सूचना प्रशासनाला व संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. डीपीकडे जाणाऱ्या जागेतील अस्वच्छता दूर करण्याबाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्या.

चिकन विक्रेत्यांकडून शिल्लक राहिलेले मांस मासळी उचल करण्याची व्यवस्था नियोजित व्हावी. अस्वच्छता राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. याबाबत स्वच्छता विभागाला सूचना दिल्या.

नगरसेविका पूनम चव्हाण यांनीही आक्रमक व अभ्यासपूर्ण शैलीत भुमिका मांडली. स्वच्छता आणि बांधकाम विभागाने जुन्या चुकांकडे न पाहता आता मत्स्यविक्रेत्यांचे प्रश्न मार्गी जलद गतीने मार्गी लागावेत यासाठी गतिमानता आणावी असे सांगितले.

मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी स्वच्छतेचे प्रश्न त्वरित सोडवले जातील आणि बांधकामाशी निगडित जी कामे आहेत त्या कामांचा प्रस्ताव बांधकाम विभागामार्फत तयार करून कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले.

समस्या दूर करण्यासाठी कटिबद्ध : नगराध्यक्ष

महिला मत्स्यविक्रेत्यांच्या सोयीसाठी आणि मंडईच्या स्वच्छतेसाठी पालिका प्रशासन कटिबद्ध आहे. येथील उघड्या डीपीचा प्रश्न, पाण्याचा निचरा, बैठक व्यवस्था या समस्यांवर आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात योग्य तोडगा काढून त्या दूर करण्याची कार्यवाही केली जाईल. अन्य आवश्यक सोई सुविधा उपलब्ध केल्या जातील. असे नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom