कणकवली : कणकवली नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा “कणकवली नगरपंचायत भारतीय जनता पार्टी गट” असा अधिकृत गट स्थापन केल्यानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ओरोस येथे नगरसेवकांनी ही भेट घेतली.
यावेळी गटनेत्या सुप्रिया समीर नलावडे यांच्यासह भाजप गटामध्ये प्रभाग क्रमांक १ मधून राकेश बळीराम राणे, प्रभाग क्रमांक २ मधून प्रतीक्षा प्रशांत सावंत, प्रभाग क्रमांक ३ मधून स्वप्नील शशिकांत राणे, प्रभाग क्रमांक ५ मधून मेघा अजय गांगन, प्रभाग क्रमांक ९ मधून मेघा महेश सावंत, प्रभाग क्रमांक १० मधून आर्या औदुंबर राणे, प्रभाग क्रमांक १२ मधून मनस्वी मिथुन ठाणेकर तसेच प्रभाग क्रमांक १६ मधून संजय मधुकर कामतेकर यांचा समावेश आहे. असे सदस्य उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायत नगरसेवकांनी गट स्थापनेनंतर पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट
