Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने शिवसेना संतप्त

ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने शिवसेना संतप्त

अखेर थकीत पगार तात्काळ देण्याबाबत ठेकेदाराची ग्वाही : कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार मिळाला नसल्याची माहिती मिळताच शिवसेना महिला शहरप्रमुख तथा नगरसेविका पुनम चव्हाण व शिवसेना पदाधिकारी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेकदार बदलण्यात यावा अशी भुमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान शिवसेनेच्या यशस्वी चर्चेनंतर अखेर ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तात्काळ देण्याचे कबूल केले आहे.

ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने मानधन दिले जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तिन्ही कामगारांची कुटुंबांची उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. यातील काही कामगार हे भाड्याच्या खोलीत राहत असल्याने त्यांना घरमालकांनी खोली रिकामी करण्याचीही सूचना केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना महिला शहरप्रमुख तथा नगरसेविका पूनम चव्हाण, शहरप्रमुख नगरसेवक दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील यांच्याशी चर्चा केली.

यावेळी नगरसेवक सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, नगरसेविका शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, मेघा सावंत, अश्विनी कांदळकर, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, विश्वास गावकर, शेखर गाड, किसन मांजरेकर, तेजस लुडबे, बाळू नाटेकर यासह अन्य उपस्थित होते.

कर्मचाऱ्याला मानधन देता येत नसेल तर ठेकेदाराने ठेका का घेतला ? कर्मचाऱ्यांचे मानधन वेळच्या वेळी जमा व्हायला हवे. सर्वांचंच कुटुंब असते, कुठून पैसा आणणार ते ? शासनाकडून निधी आला नसेल तरी कर्मचाऱ्यांची उपासमार होते हे दुर्दैवी आहे. त्यासाठी ठेकेदार सक्षम असावा लागतो. शिवाय किमान वेतनानुसार कर्मचाऱ्यांना मानधन मिळायला हवे, जर कर्मचाऱ्यांचे मानधन देता येत नसेल तर ठेका का घेतला, त्यापेक्षा ठेकेदार बदला अशी मागणी यावेळी पूनम चव्हाण आणि पदाधिकाऱ्यांनी केली. कर्मचाऱ्यांना ओळखपत्र नाही, गणवेश नाही, हे कर्मचारी आहेत हे सर्वसामान्यांनी कसं ओळखायचं ? असाही प्रश्न पूनम चव्हाण यांनी केला. यावेळी कार्यालयीन कर्मचारी सौ. वस्त यांनी कर्मचाऱ्याने बँक खाते नंबर दिला नसल्याचे सांगितले. याबाबत वारंवार त्याच्याकडे विचारणा करण्यात आल्याचेही सांगितले. मात्र, बँक खात्याबाबबत मला विचारणाच झाली नसल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. एखादा कर्मचारी पगार मिळत असेल तर खाते नंबर देणार नाही का ? हे पटण्यासारखे नसल्याचे पूनम चव्हाण यांनी सांगितले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ यांनी ठेकेदारासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी दीपक पाटकर यांनी ठेकेदाराशी चर्चा करत कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव न करता सर्वांना सारखेच मानधन देण्यात यावे, शिवाय राहिलेल्या महिन्याचे मानधन तात्काळ देण्याची भुमिका मांडली. त्यावर ठेकेदाराने मानधन लवकरच जमा करणार असल्याचे स्पष्ट केले.

rapan bottom