Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

लोकसहभागातून वनराई बंधारा

लोकसहभागातून वनराई बंधारा

कदमवाडी येथे आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतचा उपक्रम

मालवण | प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ यांच्या वतीने कदमवाडी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

जलसंधारणाचे महत्त्व ओळखून आणि गावच्या पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी श्रमदानातून हा बंधारा पूर्ण केला.

या उपक्रमासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी रवींद्र टेंबुलकर आणि उपसरपंच दिलीप गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, कर्मचारी विजय चव्हाण, केंद्र चालक प्रिशा बांदल, ग्रामपंचायत सदस्य अनिल सुकाळी आणि माजी सरपंच रवींद्र टेंबुलकर, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत घाटगे, पाणी कर्मचारी अनंत नांदोसकर आदी सहभागी झाले होते.
हा बंधारा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले. यामध्ये रमेश बांदल, दुर्गेश परब, गौरव कदम, मनोहर बांदल, लाजरी परब, चिन्मय परब, तनिष बांदल यांसह अन्य ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता.
गावाच्या विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'लोकसहभागातून ग्रामविकास' हे ब्रीदवाक्य या निमित्ताने खऱ्या अर्थाने सार्थ ठरल्याची भावना सरपंच रश्मी टेंबुलकर यांनी यावेळी व्यक्त केली.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom