Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सक्षम व जनाधार असलेल्या राजकीय पक्षाची कास धरणार

सक्षम व जनाधार असलेल्या राजकीय पक्षाची कास धरणार

वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर

कुडाळ : वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी भविष्यातील राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील मित्रपरिवार, हितचिंतक, कार्यकर्ते तसेच सहकारी यांची बैठक कुडाळ येथे आयोजित केली होती. या बैठकीत महेश परुळेकर यांनी समाजातील वंचित, उपेक्षित व दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी सक्षम व जनाधार असलेल्या राजकीय पक्षाची कास धरणार असल्याचे सुतुवाच केले आहे. त्यामुळे महेश परुळेकर आता कोणत्या राजकीय पक्षासोबत जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

महेश परुळेकर हे 1997 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि विद्यार्थी आघाडीवर तसेच विविध धार्मिक संघटनेचे काम करत आहेत. 2014 मध्ये जनता दल या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील समस्यांकरता अनेक आंदोलने, मोर्चा निवेदने आणि वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. 2017 मधें महेश परुळेकर यांना भारिप बहुजन महासंघ या ऍड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. 2017 ते माहे नोव्हेंबर 2025 पर्यंत भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.
महिनाभर वंचित कडून संपर्क नाही
मी वंचित बहुजन आघाडीचा आजीव सभासद आहे. नोव्हेंबर मध्ये वंचित पक्षाकडून माझ्या नेतृत्वाखालील वंचितची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. परंतु गेले महिनाभर कोणत्याही पद्धतीचा संपर्क पक्षाच्या वरिष्ठ व नवनिर्वाचित सदस्यांनी केला नसल्याचे परुळेकर यांचे म्हणणे आहे.
म्हणूनच वैयक्तिक भूमिका घेण्याचे ठरवले
गेली 29 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध बांधव, मराठा बांधव, चर्मकार बांधव, नाभिक बांधव, कुंभार बांधव अदिक्षित बांधव यांच्यासहित वेगवेगळ्या समाजाच्या मूलभूत समस्यांवर काम करण्यासाठी आपण योगदान दिले आहे. त्यामुळे या सर्व समाजातील लोक माझ्यासोबत जोडले आहेत. पक्षाचे काम करत असताना मी कधीही माझ्या नात्यागोत्यातल्या लोकांना पदे दिली नाहीत तर समाजामध्ये खऱ्या अर्थाने जो काम करतो त्या व्यक्तीला नेतृत्व करण्याची संधी मी दिली या माझ्या स्वभावामुळे कदाचित काही लोकांना मी नकोसा झालो होतो आणि म्हणूनच जातीच्या बाहेर गेलेली आंबेडकरी चळवळ पुनश्च जातीत बंदिस्त करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मी माझी वैयक्तिक भूमिका घेण्याचे ठरवले आहे असे महेश परुळेकर यांनी कुडाळ येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
यावेळी वेंगुर्ले , सावंतवाडी , कुडाळ , मालवण , कणकवली या तालुक्यातील महेश परूळेकर यांच्या सोबत काम करत असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी जिल्ह्यातील बुद्धिजीवी, कर्मांचारी, जिल्ह्यातील पतसंस्थेचे पदधिकारी, संचालक तसेच महेश परूळेकर यांच्याशी संबंधित वकील , पत्रकार आणि अन्य बहुसंख्य प्रतिनिधी उपस्थित होते.

rapan bottom