Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

देऊळवाडा मार्गांवरील वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस नियुक्त करा

देऊळवाडा मार्गांवरील वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस नियुक्त करा

नगरसेवक दिपक पाटकर, नगरसेविका नीना मुंबरकर यांचे पोलीस प्रशासनास निवेदन

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात पर्यटक मोठया संख्येने दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या वाहनांची रहदारी वाढल्यामुळे मालवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा मार्गांवर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी देऊळवाडा महापुरुष मंदिर तसेच नारायण मंदिर येथे 10 जानेवारी पर्यत वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस तसेच होमगार्डची व्यवस्था व्हावी. अशी मागणी नगरसेवक दिपक पाटकर व नगरसेविका नीना मुंबरकर यांच्या वतीने मालवण पोलीस प्रशासनास करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मालवण शहर देऊळवाडा महापुरुष पार ऑक्ट्रॉय नाका ते सागरी महामार्ग देऊळवाडा पुलापर्यंत मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. रस्ता अरुंद आहे व दोन्ही बाजूला दुकाने व घरे आहेत, पर्यटकांच्या गाड्यांची रहदारी वाढल्यामुळे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी महापुरुष मंदिर येथे आणि देऊळवाडा नारायण मंदिर येथे 10 जानेवारी पर्यत वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिस तसेच होमगार्डची व्यवस्था व्हावी. जेणेकरून वहातुक अडथळा टळेल व अपघात प्रमाणही कमी होईल. असे निवेदन नगरसेवक दिपक पाटकर व नगरसेविका नीना मुंबरकर यांच्या वतीने मालवण पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom