मालवण | प्रतिनिधी : कृ. सी. दे.शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष श्रीपाद शंकर तथा बाळासाहेब पंतवालावलकर (वय 84) रा. चिवला बीच नजीक कोतेवाडा, मालवण यांचे शनिवारी रात्री मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
वालावलकर यांनी 12 वर्षे कृ. सी. दे. शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिले. श्री. शिवाजी वाचन मंदिर, भरड मालवणचे माजी विश्वस्त, मौनीनाथ मंदिर चे माजी सल्लागार तसेच अनेक संस्थांवर त्यांनी काम केले. ते कोल्हापूर येथील वालावलकर संस्थेच्या हाॅस्पीटलचे अध्यक्ष ही होते. मुणगे येथे वालावलकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
वालावलकर यांनी शासनाच्या रेशनिंग विभागात मोठ्या अधिकार पदावर सेवा बजावली. बॅ. अंतुले मुख्यमंत्री असताना पंतवालावलकर यांच्यावर मोठी जबाबदारी होती.
डॉ. राहुल पंतवालालकरांचे वडील तर डॉ. रुपाली पंतवालावलकर यांचे सासरे होत.

