Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सन्मानधन | महिला घरेलू कामगारांना शासनाकडून दहा हजारांचे 'सन्मानधन'

सन्मानधन | महिला घरेलू कामगारांना शासनाकडून दहा हजारांचे 'सन्मानधन'

सिंधुदुर्ग जिल्हयातील ३४० महिलांच्या खात्यात जमा होणार १० हजार

भारतीय मजदूर संघाच्या मागणीची पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडून दखल

भारतीय मजदूर संघाने मानले पालकमंत्र्यांचे आभार

भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव हरी चव्हाण यांची माहिती

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वय वर्ष ५५ पूर्ण झालेल्या नोंदीत घरेलू महिला कामगारांना सन्मानधन रुपये १० हजार मिळावे यासाठी भारतीय मजदूर संघातर्फे सिधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील २९६ एवढ्या घरेलू कामगारांना सन्मानधन रुपये १० हजार प्रमाणे एकुण रक्कम रुपये २९ लाख ६० हजार एवढी कामगारांच्या बैंक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी दिली.

जिल्हयातीत महिला घरेलू कामगारांच्या प्रश्नी पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने तक्ष देत सर्वमहिलांना सन्मानधन तातडीने देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यांनी महिलांचे उपलब्य झालेल्या मागणी अर्जावर कार्यवाही करत सन्मानधन तात्काळ बॅंक खात्यामध्ये जमा केले आहे. घरेलू महिला कामगाराच्या सन्मानधनाच्या प्रत्नासाठी सातत्याने शासनाचे लक्ष वेधणाऱ्या भारतीय मजदूर संघाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी घेतलेल्या भूमीकेचे स्वागत करत शासन निर्णयानुसार प्रशासकीय यंत्रनेने कार्यवाही केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

३४० महिला घरेलू कामगारांना मिळणार फायदा

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदीत असलेल्या व ३१ डिसेंबर २०२४ अखेर वय वर्ष ५५ ते ६० वयोगटातील घरेलू कामगारांना सन्मानधन रुपये १० हजार देण्याचा शासन निर्णय असतानाही सिधुदुर्ग जिल्ह्यातील ३४५ एवढ्या पात्र घरेलू कामगारांना सन्मानधन रक्कम शासनाकडून प्राप्त होत नव्हती. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सन्मानधनाची रक्कम यापूर्वीच घरेलू कानगारांच्या खात्यात जमा करण्यात आली होती. याबाबत भारतीय मजदूर संघ आपल्या परीने पाठपुरावा करून सन्मानधन रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करत होता. याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन घरेलू कामगाराच्या सन्मानधन निधी बाबत व अन्य प्रश्नांबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. यावेळी विभाग संघटनमंत्री भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंत‌कुमार परब, जिल्हा कोषाध्यक्ष ओंकार गुरव, प्राची परब तसेच घरेलू कामगार संघाच्या पदाधिकारी व इतर भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सन्मानधन मिळण्यास पात्र असलेल्या एकूण घरेलू कामगारांसाठीची निधी रक्कम रुपये ३४ लाख कामगार अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांना प्राप्त करुन दिली. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यानंतर ३४० जणांची रक्कम उपलब्ध झालेली आहे. उर्वरीत पाच जणांची आणि नव्याने उपलब्य होणाचा अर्जधारक महिलांना सन्मानधन रक्कम मिळण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यानुसार कणकवली १५२, मालवण ९४, देवगड ५, वैभववाडी ६३. कुडाळ २०, वेगुर्ला ३, दौडामार्ग ८ अशी जिल्ह्यातील एकूण ३४५ एवढ्या परंतु कामगारानी मागणी अर्ज सादर केले आहेत त्यांपैकी २९६ घरेलु कामगार यांची प्रत्येकी १० हजार प्रमाणे रक्कम रुपये २९ लाख ६० हजार आज सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम यानी कामगाराच्या बैंक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली असून, भारतीय मजदूर संचाचा पाठपुरावा व पालकमंत्री यांच्या सहकार्यामुळे कामगारांना न्याय मिळाला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले,

कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

असंघटित क्षेत्रातील घरेलू कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ज्या पात्र घरेलु कामगारांनी सन्मानधन मागणी अर्ज सादर केला नसल्यास भारतीय मजदूर संघाशी संपर्क साधावा असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. घरेलू कामगाराना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी भारतीय मजदूर संघ प्रयत्न करत आहे. नवीन लेबर कोडच्या माध्यमातूनही असंघटित क्षेत्रातीत कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार असून, त्याचाही फायदा घरेलू कामगारांना होणार आहे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

घरेलू कामगारांना मिळणार भांडी संच

त्याचबरोबर ३१ जुलै २०२४ अखेर पर्यंत ज्या घरेलू कामगारांची नोंदणी झालेली आहे. अश्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ घरेलू कामगारांना लवकरच संसार उपयोगी भांडी संच मिळवून देण्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांच्यामार्फत भारतीय मजदूर संघाचा पाठपुरावा चालू असून त्याचीही तातडीने कारवाई होणार असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom