आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांची माहिती
अमित खोत | मालवण : मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा दौलाने फडकला. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मोठे यश मिळवले. दरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता मनमोहन वराडकर या आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता मालवण नगरपरिषद येथे पदभार स्वीकारणार आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी दिली.
निवडणुकी पूर्वी मालवणाचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर- नारायण चरणी नतमस्तक होत फक्त शिवसेना उमेदवार यांनी पारदर्शक कारभाराची शपथ घेतली होती. आता आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराचा सर्वांगीण विकास, जनतेची सेवा आणि पारदर्शक कारभारसाठी नगराध्यक्ष ममता वराडकर यांसह शिवसेना नगरसेवक सज्ज झाले आहेत.
नगरसेवक दिपक पाटकर, नीना मुंबरकर, पुनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गांवकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, भाग्यश्री मयेकर यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.
फोटो : ममता वराडकर

