विजयी वीस नगरसेवकात सर्वात तरुण नगरसेवक म्हणूनही झाली नोंद
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक मतमोजणीत विजयी झालेल्या 20 नगरसेवकात भाजपचे युवा नेतृत्व ललित चव्हाण सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. 307 मताधिक्याने त्यांनी विरोधी उमेदवारांचा पराभव केला. सोबतच सर्वात तरुण 27 वर्षीय नगरसेवक म्हणूनही त्यांची नोंद झाली आहे.
भाजपा युवा मोर्चा मालवण शहर अध्यक्ष पदी कार्यरत असलेले ललित चव्हाण यावेळी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून विजयी झालेच. त्या सोबत सर्वाधिक मताधिक्याचा विजयही त्यांनी नोंद केला. 307 मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला. 300 पेक्षा जास्त मताधिक्य शहारात कोणत्याच नगरसेवकांना मिळाले नाही.
ललित चव्हाण यांच्या नंतर भाजपचेच माजी नगरसेवक मंदार केणी हे 271 मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर हे 266 मताधिक्याने विजयी झाले. अन्य विजयी नगरसेवक यांचे मताधिक्य या खालोखाल आहे. अनेक प्रभागात चुरशीची लढत झाली.
विजयी प्रमाणपत्र स्वीकारले
भाजपाचे ललित चव्हाण यांनी नगरसेवक पदी विजयी झाल्या नंतर सोमवारी मालवण नगरपरिषद येथे अधिकाऱ्यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र स्वीकारले.

भाजपाचे ललित चव्हाण सर्वाधिक मताधिक्याने विजयी
