विजयाचा उन्माद नाही डीवचणाऱ्या घोषणा नाही…!
तेही आमचे कुटुंबच…
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. यात अतिशय हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या मालवण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने बाजी मारली. या अभूतपूर्व विजयानंतर स्वाभाविकपणे आमदार निलेश राणे हे मोठ्या जल्लोषात रॅली वगैरे काढून विजयोत्सव करतील अशी कार्यकर्त्यांसहित अनेकांची अपेक्षा होती. मात्र आमदार निलेश राणे यांनी जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात येऊनही पत्रकारांशी शांतपणे संवाद साधत संवेदनशील भुमिका मांडली.
आमच्या एका डोळ्यास हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मालवण व कणकवली निकाल दृष्टीने ही प्रतिक्रिया सर्वकाही सांगून जाते. हृदयातील आपलेपणाच्या भावना स्पष्ट करते.
आमच्याच कुटुंबातील असलेल्या कार्यकर्त्यांचा कणकवलीत पराभव झाला, हे आपल्यासाठी अतिषक दुःखद असल्याच्या आमदार निलेश राणे यांच्या वक्तव्यातून संवेदनशील हळवा राजकारणी सर्वांना दिसला.
एकट्याने लढून मिळलेल्या विजयाने हुरळून जाऊन विजयाचा उन्माद करत आव्हानाची भाषा करणारे अनेक राजकारणी अनेक ठिकाणी दिसतात. मात्र कणकवलीत भाजपा उमेदवाराचा झालेला पराभव व एकंदरीतच स्वकियांशी नाईलाजाने द्यावा लागलेला लढा यामुळे दैदिप्यमान विजय मिळवूनही अतिशय शांतपणे विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत व पराभूत झालेल्या उमेदवारांच्याप्रती आपुलकी व्यक्त करत आमदार निलेश राणे यांनी सर्वांची मन जिंकली आहेत.
नेता असावा तर असा अश्याच भावना या निमित्ताने व्यक्त होत होत्या.

