Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर 'शिवसेनेचा भगवा'

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर 'शिवसेनेचा भगवा'

शिवसेनेच्या ममता वराडकर एक हजार मताधिक्याने नगराध्यक्षपदी विजयी

बहुमतासह शिवसेनेचे १० नगरसेवक | भाजपाचे ५ तर उबाठा ४ नगरसेवक : १ अपक्ष

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर मालवण शहर वासियांनी उमटवली विजयी मोहर

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर मालवण शहर वासियांनी पुन्हा एकदा विजयी मोहर उमटवली आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला. संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर यांनी 1022 मताधिक्यानी मोठा विजय मिळवला. सोबतच शिवसेनेचे दहा नगरसेवक विजयी झाले. शिवसेनेने पालिकेत निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

दरम्यान, भाजपा ५ जागांवर तर उबाठा ला ४ जागांवर समाधान मानावे लागले. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हे अपक्ष म्हणून पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. यावेळी विजयी उमेदवार व शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, उमेश नेरुरकर यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत विजयी जल्लोष केला. आमदार निलेश राणे यांनीही उपस्थित राहून शिवसेना विजयी नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी फटाका्यांची आतिषबाजी करण्यात आली.

विजयी उमेदवार मध्ये शिवसेनेचे दीपक पाटकर, नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गावकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, महेश कोयंडे. भाजपाचे मंदार केनी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, महानंदा खनोलकर, अन्वेषा आचरेकर तर उबाठाचे महेंद्र म्हाडगुत, अनिता गिरकर, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर हे विजयी झाले.

या निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा खोत आणि नगरसेवक पदासाठी यतीन खोत तसेच सन्मेश परब आणि सेजल परब या दाम्पत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. प्रभाग क्रमांक ७ मध्ये मेघा गावकर यांना ३८९ मते मिळाली. त्यांनी उबाठा उमेदवार यांचा चार मतांनी पराभव केला.

यापूर्वी नगरसेवक राहिलेले मंदार केणी, दर्शना कासवकर, महानंदा खनोलकर, दीपक पाटकर, नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, महेंद्र म्हाडगुत, सुदेश आचरेकर यांनी नगरपालिकेत पुन्हा एकदा एंट्री केली. तर 12 नवे चेहरे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत.

शिवसेनेचे दीपक पाटकर, नीना मुंबरकर, पूनम चव्हाण, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, मेघा गावकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, महेश कोयंडे यांचे वीजय लक्षवेधी ठरले. सोबतच शिवसेनेला पालिकेत बहुमताकडे नेणारे ठरले आहेत.

सर्वांचे आभार : नगराध्यक्षा ममता वराडकर

नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह सर्व मतदार, मालवण वासीय तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानले आहेत. एकूणचे विजयाचे श्रेय सर्वांचे असल्याचे सांगत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासाठी कटीबद्ध असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश राणे यांच्या 'व्हिजन' चा विजय : दत्ता सामंत

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा आणि शहर विकासाच्या व्हिजन चा हा विजय आहे. गतिमान विकासातून मालवण शहर जागतिक दर्जाचे शहर बनवणार हे आमदार निलेश राणे यांचे दूरदृष्टी व्हिजन. या सर्वाला जनतेने खंबीरपणे साथ देऊन मिळालेला हा विजय आहे. आमचे नगराध्यक्षा व सर्व नगरसेवक जनतेला अपेक्षित असा परदर्शक कारभार करतील. असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

अमित खोत, मालवण

rapan bottom