टोपीवाला हायस्कुलची कु. साक्षी संजय रावराणे प्रथम
मालवण : 'राष्ट्रीय ग्राहक दिन' निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तालुका मालवण शाखेच्या वतीने इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. साक्षी संजय रावराणे (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवण), द्वि. क्र. कु. भार्गवी महेश आंबेरकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवण) तृ. क्र. कु. सिया गणेश परब (रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी भूतनाथ मालवण), उत्तेजनार्थ प्र. क्र. कु वेदिका गुरुनाथ परब (रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी भूतनाथ), उत्तेजनार्थ द्वि. क्र. कु. मानसी कमलाकांत मसुरकर (अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल मालवण) यांनी यश प्राप्त केले आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख रु. १,०००, द्वि. क्र. रु. ७५०, तृ. क्र. रु. ५०० (श्रीमती वफा जमशीद खान पुरस्कृत), तसेच उत्तेजनार्थ प्र. क्र. रु. ३००, उत्तेजनार्थ द्वि. क्र. रु. २०० (श्रीकांत वेंगुर्लेकर पुरस्कृत) असून या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाची तारीख, स्थळ व वेळ मागाहून कळविण्यात येईल अशी माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र, तालुका शाखा मालवण अध्यक्ष श्रीकांत वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.

