Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ विभागीय स्पर्धेत मालवणच्या रजत तोरसकर ची 'सुवर्ण' भरारी

राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठ विभागीय स्पर्धेत मालवणच्या रजत तोरसकर ची 'सुवर्ण' भरारी

राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेपाठोपाठ जयपूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत यश

रजत तोरसकर याचा समावेश असलेल्या नागपूर विद्यापीठ पुरुष संघाला सुवर्णपदक

मालवण | प्रतिनिधी : मालवणचे सुपुत्र रजत तोरसकर याचा समावेश असलेल्या नागपूर विद्यापीठ पुरुष संघाने जयपूर येथे संपन्न झालेल्या विद्यापीठ विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (आरटीएमएनयू) पुरुष टेबल टेनिस संघाने चमकदार कामगिरी करीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेबल टेनिस अजिंक्यपद २०२५-२६ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

ही स्पर्धा १५ ते १९ डिसेंबरपर्यंत जयपूर येथील महात्मा जोतिबा फुले विद्यापीठात पार पडली. उपांत्यपूर्व फेरीत नागपूर विद्यापीठाने गुजरातमधील मारवाडी विद्यापीठाचा ३-२ असा पराभव केला. उपांत्य फेरीत संघाने एसआरपीएम नांदेड विद्यापीठाचा ३-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत आरटीएमएनयूने सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा ३-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

विद्यापीठाच्या कुलगुरू मनाली क्षीरसागर आणि क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संभाजी भोसले यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल संघाचे अभिनंदन केले. नुकत्याच संपन्न झालेल्या नांदेड येथील राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेमध्ये सुद्धा नागपूर विद्यापीठात सुवर्णपदक पटकावले होते. गेल्या वर्षी पार पडलेल्या खेलो इंडिया विभागीय विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये रजत पदक मिळविले होते. तसेच नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते.सलग मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून रजत तोरसकर आणि त्याच्या संघाचे अभिनंदन होत आहे. रजत तोरसकर हा मालवण येथील अ.शी.दे टोपीवाला हायस्कूल तसेच स.का. पाटील महाविद्यालय याचा माजी विद्यार्थी आहे. त्यांनी टेबल टेनिसचे प्राथमिक धडे प्राथमिक धडे मालवण येथील कोरगावकर टेबल टेनिस अकादमी मध्ये गिरवले.

rapan bottom