मंदिर, चर्च तसेच सार्वजनिक ठिकाणी १० सोलर लाईटचे होणार लोकार्पण
आतापर्यंत पास्कोल रॉड्रीग्ज यांनी ४० सोलर लाईट देवबाग गावासाठी मोफत स्वरूपात केल्या उपलब्ध
मालवण | प्रतिनिधी : देवबाग ग्रामपंचायत सदस्य श्री. पास्कोल रॉड्रीग्ज यांच्या सहकार्याने देवबाग मधील मंदिरं तसेच चर्च आणि सार्वजनिक ठिकाणी मोफत 10 सोलर लाईट चे लोकार्पण होणार आहे. ग्रामस्थांनी पास्कोल रॉड्रीग्ज यांच्या या उपक्रमाचे कौतुक करतं शुभेच्छा दिल्या आहेत.

आतापर्यंत पास्कोल रॉड्रीग्ज यांनी 40 सोलर लाईट मोफत स्वरूपात देवबाग गावासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामस्थांनी पास्कोल यांचे आभार व्यक्त करून पुढील समाजकार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या उपक्रमाचे गावातील जनतेकडून कौतुक होत आहे.

