भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक नियोजन मधून मंजूर झालेल्या किर्लोस गावठण वाडी येथील देवसू बंधारा भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच किर्लोस गावठणवाडी ते भटवाडी स्ट्रीट लाइट चे भूमिपूजन जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते करण्यात आले. बंधारासाठी 15 लाख तर स्ट्रीट लाईट साठी 5 लाख निधी मंजूर झाला आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकार, माजी उप सभापती राजू परुळेकर, माजी जिल्हा परिषद सभापती महेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक पंकज सादये, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, मानसी भावे सौ गावडे, उपसरपंच अजित लाड, किर्लोस पोलीस पाटील किशोर लाड माजी पोलीस पाटील अनाजी कदम, भाजप जेष्ठ कार्यकर्ते गजू बाक्रे, कांता भावे, सामाजिक कार्यकर्ते दीपक किर्लोस्कर, सूर्यकांत घाडीगावकर, शशिकांत घाडीगावकर, दिलीप घाडीगावकर, अनिल घाडीगावकर ज्ञानेश्वर घाडीगावकर सतीश नलावडे भाजप शक्तिकेंद्र प्रमुख दया हाटले, कमलेश घाडीगावकर किर्लोस बूथ कमिटी अध्यक्ष बाळा घाडीगावकर, माजी उपसभापती अरुण मेस्त्री, नरेश कामतेकर, अभद प्रभूदेसाई किर्लोस सोसायटी अध्यक्ष स्वानंद भावे, उपाध्यक्ष श्रीधर गावडे, गोठणे माजी उपसरपंच राजू लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व धोंडी चिंदरकर यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. अशी माहिती महेंद्र चव्हाण यांनी दिली.
▪️अमित खोत, मालवण

