मालवण : कातवड कांदळगाव येथील श्री देव राष्ट्रोळी महापुरुष पार येथे त्रैवार्षिक श्री देव सत्यनारायणाची महापूजा बुधवार १७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
महापुरुष फार येते सकाळी ९ वा अभिषेक पूजन, दुपारी ४ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, ग्रामस्थांची आरती, सायं ७ वा. स्थानिक ग्रामस्थांचे भजन,रात्री ८ वा. महाप्रसाद रात्र ९ वा आमने-सामने २०-२० डबलबारीचा जंगी सामना बुवा सुशांत जोईल, गुरुवर्य ,अभिषेक शिरसाठ, दुर्वास गुरव, पखवाज तुषार शिंदे, तबला ओंकार लब्दे, विरुद्ध बुवा वेंकटेश नर, गुरुवर्य प्रकाश पारकर, पखवाज भावेश लाड, तबला किर्तीराज जाईल,
यांच्यात होणार आहे. तरी समस्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री ब्राह्मण देव ग्रामस्थ मंडळ कातवड वाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

