महाराष्ट्र राज्य ३९ व्या राज्यस्तरीय खो खो अजिंक्य पद स्पर्धेसाठी सात मुलींची निवड
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व मुलीचे अभिनंदन करतं दिल्या शुभेच्छा
शानू वालावलकर | स्काय न्युज टुडे : दि अमॅचुअर खो खो असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित 14 वर्षे वयोगटाखालील स्पर्धा मालवण रेकोबा हायस्कूल मालवण येथे संपन्न झाली. मुलींच्या जिल्हा खो खो अजिंक्यपद स्पर्धा सन 2025 मध्ये महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 या जिल्हा परिषद शाळेचा मुलींचा खो-खो संघ विजेता ठरला आहे.
या संघामध्ये कुमारी रेवा शिवराम परब, कुमारी हर्षदा समीर वेदरे, कुमारी तनिषा तुषार श्रावणकर, कुमारी ऋतिका रुपेश परब, कुमारी नव्या सुरेश राणे, कुमारी शुभ्रा प्रशांत परब, कुमारी जान्हवी संतोष घाडी, कुमारी रिया प्रकाश यादव, कुमारी प्रचिती प्रशांत गवस, कुमारी दूर्वा मंगेश यादव, कुमारी रिया समीर सडेकर, कुमारी सारंन्या चंद्रसेन लाड, कुमारी निधी निलेश दळवी या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या संघांवर मात करत हा संघ जिल्हा विजयी झालेला आहे.
दिनांक 25 ते 28 डिसेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य 39 व्या राज्यस्तरीय खो खो अजिंक्य पद स्पर्धेसाठी या संघातील सात मुलींची निवड झालेली आहे. जिल्हा परिषद शाळांची माध्यमिक गटातून निवड होणे ही मालवण तालुक्याच्या इतिहासातील प्रथमच घटना घडलेली आहे. यामध्ये कुमारी रेवा शिवराम परब, कुमारी हर्षदा समीर वेदरे, कुमारी तनिषा तुषार श्रावणकर, कुमारी ऋतिका रुपेश परब, कुमारी नव्या सुरेश राणे, कुमारी शुभ्रा प्रशांत परब, कुमारी दूर्वा मंगेश यादव या सात मुलींची निवड झालेली आहे.
यापूर्वी प्राथमिक व माध्यमिक पावसाळी शालेय गटातील स्पर्धेमध्ये याच संघातील 05 मुलींची कोल्हापूर विभागासाठी सांगली येथील खो खो स्पर्धेसाठी निवड झालेली होती. हे देखील कौतुकास्पद आहे.
श्रावण मारुती मंदिर वार्षिक जत्रा नमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व मुलीचे अभिनंदन करतं शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाप्रमुख विनायक बाईत, माजी सभापती सुनील घाडीगावकर, बाळू कुबल, दीपक पाटकर,अभि लाड, प्रशांत परब, मंगेश यादव, मॅजिक रिक्षा संघटना पदाधिकारी व सदस्य ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

