Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

कुडाळ मालवण मतदारसंघातील १२ हजार शेतकऱ्यांसाठी २.७९ कोटींची नुकसानभरपाई !

मालवण : ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी अखेर शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या एकूण ४ कोटी रुपयांच्या भरपाईपैकी ५० टक्क्यांहून अधिक, म्हणजेच तब्बल २ कोटी ७९ लाख ६० हजार ७५५ रुपयांची विक्रमी भरपाई एकट्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर झाली आहे.
आमदार निलेश राणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रभावी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे मोठे यश मानले जात आहे.
ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, ज्यामुळे भातशेती, फळपिके आणि इतर शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी तातडीने व्हावी आणि जास्तीत जास्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नयेत यासाठी आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला थेट आदेश दिले होते. त्यांनी स्वतः अनेक भागांमध्ये भेट देऊन पंचनाम्यांच्या कामाचा आढावा घेतला आणि महसूल तसेच कृषी विभागाला सर्वसमावेशक पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते.
याच पाठपुराव्याचा परिणाम म्हणून, आज जाहीर झालेल्या नुकसानभरपाईच्या आकडेवारीतून कुडाळ मालवण मतदारसंघातील नुकसानीची खरी व्याप्ती समोर आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण ४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. यापैकी कुडाळ तालुका: ८,८९१ शेतकरी, मालवण तालुका: ३,१२२ शेतकरी असे कुडाळ मालवण मतदारसंघातील एकूण शेतकरी: १२,०१३ त्यात मंजूर नुकसानभरपाई २ कोटी ७९ लाख ६० हजार ७५५ रुपये.
जिल्ह्याच्या एकूण भरपाईच्या तुलनेत, कुडाळ मालवण मतदारसंघाला ५० टक्क्यांहून अधिक वाटा मिळाला आहे. ही भरपाई थेट १२ हजार १३ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून, यामुळे अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

या भरपाईच्या घोषणेनंतर आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, "शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तेव्हाच मी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आज कुडाळ मालवण मतदारसंघाला जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी नुकसानभरपाई मिळाली आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
या विक्रमी नुकसानभरपाईमुळे आमदार राणे यांच्या 'शेतकरी हिता'च्या भूमिकेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

rapan bottom