Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

नांदोस गावासाठी 'ऐतिहासिक' सुवर्ण क्षण !

नांदोस गावासाठी 'ऐतिहासिक' सुवर्ण क्षण !

नांदोस गाव देशाच्या नकाशावर ठळकपणे असेल : मंत्री आशिष शेलार

नांदोस शिवकालीन गढी पुरातत्वीय उत्खननाचा शुभारंभ

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : नांदोस शिवकालीन गढी (नांदोस गड) पुरातत्वीय उत्खननानंतर नांदोस गाव देशाच्या नकाशावर ठळकपणे येईल. नांदोस गढीच्या उत्खननातून भूगर्भात दडलेला पराक्रमी इतिहास बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. निधी कमी पडणार नाही.
अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी नांदोस मालवण येथे दिली.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालनालय यांच्यावतीने तालुक्यातील नांदोस शिवकालीन गढी (नांदोस गड) पुरातत्वीय उत्खनन शुभारंभ राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तालूकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,
नांदोस सरपंच माधुरी चव्हाण, या सर्व कार्यक्रमात महत्वाची भुमिका बजावणारे उपसरपंच विजय निकम, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, संतोष साठविलकर, अनिल कांदळकर, मंदार केणी, शेखर पेणकर, बाळ महाभोज, राजू परुळेकर, शेखर मसुरकर, पुरातत्त्व विभागाचे डॉ. तेजस गर्गे, विलास वहाने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण साटम यांनी करताना अनेक ऐतिहासिक संदर्भ देत इतिहास उभा केला.

निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही

मंत्री आशिष शेलार म्हणाले, नांदोस गढीच्या उत्खनन व संवर्धनासाठी कितीही कोटी रुपये लागले तरी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. ग्रामपंचायतीने हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवल्याबद्दल त्यांनी आभार मानले. जो समाज आपला इतिहास विसरतो, त्याचे भविष्य अंधकारमय होते. नांदोस गढी, भरतगड, भगवंत गड आणि रामगड परिसरातील उत्खनन व संवर्धनातून आपली समृद्ध विरासत पुन्हा उजेडात आणली जाईल. पंतप्रधान मोदीजींच्या 'विरासत से विकास तक' या सूत्रावर आमचा विश्वास आहे. समृद्धी तेव्हाच येते जेव्हा आपला इतिहास मजबूतपणे मांडला जातो.

उत्खनन शास्त्रीय पद्धतीने होणार

नांदोस गढीतील उत्खनन शास्त्रीय पद्धतीने केले जाईल. सापडलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद, मोजमाप आणि संदर्भ शोधला जाईल, जेणेकरून त्या वस्तूंचा संबंध गड-किल्ल्यांशी आहे की नागरीकरणाशी हे कळेल. उत्खननातून जो इतिहास समोर येईल, त्याचे 'कॉफी टेबल बुक' तयार करून त्याचे प्रकाशन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते केले जाईल असे मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

दशावतार कलावंतांच्या अडचणी दूर केल्या जातील

आमदार निलेश राणे यांनी सांगितल्या प्रमाणे दशावतार कलावंतांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्याचे काम सुरू झाले आहे. यातील अडचणी अधिवेशनाच्या काळातच बैठकी घेऊन दूर केल्या जातील, यात कुठेही अडकाठी येणार नाही. असे मंत्री आशिष शेलार म्हणाले.

कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार वाढ

ज्येष्ठ कलाकारांना मिळणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार एक लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्यात आला आहे. युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथमच एक लाख रुपयांचे स्वतंत्र पारितोषिक सुरू करण्यात आले आहे. पूर्वी १२ असलेल्या सांस्कृतिक क्षेत्र संख्या 24 झाली. तसेंच जेष्ठ आणि युवा असे ४८ पुरस्कार संख्या करण्यात आली आहे.

नाट्यगृह निधीतील तांत्रिक अडचण दूर केली जाईल

आमदार निलेश राणे यांचा मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहाच्या कामासाठीचा आग्रह योग्य आहे. याठिकाणी 13 कोटी निधी मंजूर आहे. ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील. मार्ग लवकरच काढला जाईल, असे आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी दिले.

नांदोस गावात आल्यावर आईची आठवण येते

येथे गावात आल्यावर आईची आठवण येते असे भावुक होत मंत्री आशिष शेलार यांनी नांदोस गावाशी असलेल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या गावामध्ये खेळताना, बैलगाडीतून फिरताना मिळालेले प्रेम आजही आठवते. ही पवित्र भूमीच माझ्यासाठी इथपर्यंत जाण्याची प्रेरणास्रोत ठरली," असे भावुक उद्गार त्यांनी काढले.

मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांचे विशेष कौतुक

सिंधुदुर्ग-कोकणचे विषय कॅबिनेटमध्ये आग्रही भूमिकेने मांडणारे पालकमंत्री नितेश राणे आणि मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे लाभल्याबद्दल त्यांनी येथील जनतेला 'सौभाग्यशाली' म्हटले. मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या कार्याचे विशेष कौतुक मंत्री आशिष शेलार यांनी केले.

शिवकालीन वारश्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी घेतलेले ऐतिहासिक पाऊल : आ. निलेश राणे

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य व पुरातत्व विभागाने सुरू केलेले हे कार्य मालवणच्या इतिहासाला नवे आयाम देणारे आहे. शिवकालीन वारश्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी घेतलेले हे ऐतिहासिक पाऊल भविष्यातील पिढ्यांना आपल्या मातीचा अभिमान अधिक दृढ करणारे आहे. असे सांगून आमदार निलेश राणे म्हणाले, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नांदोस गढी उत्खननाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास आहे. त्यांच्या राज्यातील विविध उपक्रमांचे कौतुक त्यांनी केले. आमदार निलेश राणे यांनी मतदार संघातील विकास कामांचा प्रामुख्याने उल्लेख केला. मामा वरेरकर हॉलसाठी यापूर्वी मंजूर झालेले १३ कोटी रुपयांचे अनुदान काही तांत्रिक कारणाने रखडले आहे. तातडीने मिळावे. यातील अडचणी दूर करण्यासाठी सचिवांना सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार राणे यांनी केली. यासोबत आपण मागणी केल्या नुसार दशावतार कलाकारांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार राणे यांनी त्यांचे मंत्री शेलार यांचे विशेष आभार मानले. कलाकारांच्या अडचणी मांडल्यानंतर त्यांनी त्वरित दखल घेतली. कलाकारांच्या मागणीनुसार त्यांनी शासकीय निर्णय काढला. कलाकारांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र तातडीने व ऑनलाइन पद्धतीने मिळावे यासाठी शेलार यांनी पुढाकार घेतला आणि ही प्रक्रिया सुरू झाली. सद्यस्थितीत दशावतार कलाकारांसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन पद्धतीत सध्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत, ज्यामुळे प्रमाणपत्र आणि दाखले इनपुट करण्याची प्रक्रिया थांबली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र मंत्री आशिष शेलार यांनी त्वरित लक्ष घालून हा ऑनलाइन एरर तत्काळ दूर करावा, अशी मागणी आमदार राणे यांनी केली. शेलार यांनी दशावतार कलाकारांना न्याय दिल्याबद्दल जिल्ह्यातर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्याची इच्छा कलाकारांनी व्यक्त केली असल्याचेही राणे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ तीन-चार तासांत सांगण्यासारखा नाही. महाराजांचे अनेक दस्ताऐवज कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये विखुरलेले आहेत. या सर्व दस्तावेजांचे संकलन होणे गरजेचे आहे. हे अत्यंत महत्त्वाचे काम सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारच करू शकतात, असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

नांदोस गावासाठी ऐतिहासिक सुवर्ण क्षण : विजय निकम

नांदोस उपसरपंच विजय निकम म्हणाले, नांदोस गढीला सव्वा दोनशे वर्षाचा इतिहास आहे. गिरोबा देवाच्या प्रेरणेने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून या गढीच्या पुरातत्वीय उत्खननाचे काम होत आहे. नांदोस गावाच्या इतिहासात हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण आहे. नांदोस गाव या गढीच्या विकासाबरोबरच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या नकाशावर जाईल विश्वास आम्हाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ गड-किल्ल्यांच्या यादीत नांदोस गढीचा समावेश झाल्यापासून तिच्या उर्जितावस्थेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. गढीच्या कामाचा पहिला पाया तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रचला तसेच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्री आशिष शेलार यांनी या गढीच्या कार्यक्रमावर 'कळस' चढवला आहे, असे सांगत त्यांनी सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या ऐतिहासिक वास्तूच्या उत्खनन आणि संवर्धन कार्यात पुरातत्व विभागाचे महत्त्वाचे योगदान आहे. पुरातत्व विभागाचे श्री. वहाने, तेजस गर्गे श्री. ढोके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या संवर्धन कार्यात स्थानिक नेत्यांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. नांदोसचे सुपुत्र व आशिष शेलार यांचे मामा श्रीकृष्ण हरसांदे यांची तर काठी आमच्या पाठीवर सतत बसत असते आणि त्याच्यातूनच हे चित्र निर्माण झाले आहे. नांदोस गढीच्या माध्यमातून गावाच्या विकासातील एक फार मोठा मैलाचा दगड दूर झाला आहे. नांदोस गढी बरोबरच गावचे ग्रामदैवत गिरोबा मंदिर जवळ सुमारे पाच ते सात एकर क्षेत्र खुले आहे. या ठिकाणी ऐतिहासिक वारसा जपत पर्यटनाला चालना देण्यासाठी शिफारशीद्वारे काही योजना राबवता आल्यास भविष्यातील नांदोस पिढीसाठी एक विकासाचे दालन तयार होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी आपण एक सुसज्ज नांदोस गढी उभी करू. हे केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक उत्तम उदाहरण ठरेल," असा विश्वास उपसरपंच निकम यांनी यावेळी व्यक्त केला.

▪️अमित खोत, मालवण

rapan bottom