Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

मंत्री आशिष शेलार यांनी भरतगड किल्ल्यावर पाहणी करून विकासकामांचा घेतला आढावा…

मंत्री आशिष शेलार यांनी भरतगड किल्ल्यावर पाहणी करून विकासकामांचा घेतला आढावा…

मसुरे प्रतिनिधी : मसूर येथील भरतगड हा एक प्राचीन किल्ला आहे. शासनाचा आतापर्यंत बारा करोड रुपयांचा निधी या किल्ल्यासाठी खर्च झालेला आहे. येथील तटबंदी मजबूत करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. यापुढील कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आपण या किल्ल्याची आज पाहणी केलेली आहे. सदर कामांचे अंदाजपत्रक लवकरच बनविण्यात येईल. ही कामे सुद्धा वेळेत पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. या किल्ल्याला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी यासाठी येथील रस्ता हा जिल्हा नियोजन किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पक्का स्वरूपाचा होण्याबाबत निर्देश देण्यात येतील. तसेच या किल्ल्या बाबतची माहिती असलेला फलक या ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी येथे दिली.

मसुरे येथील भरतगड किल्ल्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी रविवारी सकाळी भेट देऊन या किल्ल्याची पाहणी केली.



यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी किल्याचा मुख्य बुरुज, आतील टेहळणी बुरुज, खंदक, प्राचीन विहीर याबाबत माहिती घेतली. तसेच किल्यातील सिद्ध महापुरुष मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.पुरातत्व विभाग डायरेक्टर तेजस गर्गे यांना या किल्याबाबत माहिती दर्शवणारा फलक कायमस्वरूपी लावावा अशा सूचना केल्या.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सचिव अतुल काळसेकर, पुरातत्व विभाग डायरेक्टर तेजस गर्गे, सहाय्यक संचालक विलास वहाणे, मंत्री महोदयांचे ओएसडी शरद डोके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,जिल्हा बँक संचालक बाबा परब, संदीप हडकर, संग्राम प्रभूगावकर, बंडू गावडे, रोहेश गावकर, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, यासिन सय्यद, पराग खोत आदी उपस्थित होते.

rapan bottom