जल जीवन मिशन योजनेतील कामांच्या तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुकाप्रमुखांकडे द्या
जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांचे लोकप्रतिनिधी व नागरिकांना आवाहन
उद्या ओरोस येथे होणार आढावा बैठक
कुडाळ : कुडाळ व मालवण तालुक्यात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक उद्या गुरुवार ०८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी कुडाळ - मालवण तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित कामांबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील, त्यांनी आपल्या तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख यांच्या खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर लेखी स्वरूपात पाठवाव्यात. व सदर बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना प्रवक्ते मंदार केणी यांनी केले आहे.

