आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली माहिती
मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर परसलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिकोत्सव अर्थात आंगणेवाडी जत्रा सोमवार 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी दिली.

दरवर्षी धार्मिक कार्यक्रम व देवीचा कौल घेऊन आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक उत्सवाची तारीख निश्चित होते. त्यानुसार तारीख निश्चित करण्यात आली आहे.
▪️अमित खोत | मालवण

