दुपारी 11:30 मतदान आकडेवारी
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व एक नगरपंचायत साठी आज 2 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 11:30 पर्यत मालवण 30.32%, सावंतवाडी 25.92%, वेंगुर्ला 25.19%, कणकवली 34.72% मतदान झाले आहे.

मालवण रेवतळे शाळा येथील मतदान केंद्रावर मतदान मशीन बंद पडली. सुमारे एक तास मतदान बंद होते. दुसरी मशीन आल्यावर पुन्हा मतदान सुरु झाले. मात्र यावेळी मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी डीवायएसपी आढाव, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


