Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

ओबीसी आणि मराठा समाजाची फसवणूक, भंडारी समाजही संतप्त

ओबीसी आणि मराठा समाजाची फसवणूक, भंडारी समाजही संतप्त

भाजपा नगराध्यक्षा उमेदवारांचे बनावट ओबीसी सर्टिफिकेट प्रकरण न्यायालयात

त्यामुळे न्याय व्यवस्थेचा अवमान करून गुन्हेगाराला सपोर्ट करणारे स्टेटमेंट नको

आशिष शेलार तुम्ही न्यायाधीश कधी झालात?

आमदार निलेश राणे यांनी मांडली रोखठोक भूमिका

मालवण | प्रतिनिधी : ओबीसी आणि मराठा समजाची फसवणूक झाली आहे. भंडारी समाज संतप्त आहे. भाजपा नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत यांनी बनावट ओबीसी प्रमाणपत्र तयार केले आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे गुन्हेगारांना सपोर्ट होईल भूमिका मांडायला मंत्री आशिष शेलार हे न्यायाधीश नाहीत. मी त्यांचा आदर करतो मात्र त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलावे. मालवणच्या नाट्यगृहासाठी 13 कोटी जाहीर केले ते कधी येणार ते त्यांनी सांगावे. असे आमदार निलेश राणे यांनी रोखठोक भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे.

बनावट ओबीसी प्रमाणापत्र या विषयात आमच्याकडे जे पुरावे आहेत जी न्यायालयाची जजमेंट आहेत त्या आधारावर बोलत आहोत. त्या आधारावर आम्ही न्यायालयात गेलो आहोत. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होईल असे कोणतेही वक्तव्य करण्यात येऊ नये अशीच आमची भूमिका आहे

आशिष जी शेलार मी तुमचा आदर करतो तुम्ही माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहात मात्र तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलाल अशी अपेक्षा होती मात्र तसे झाले नाही गेल्यावेळी तुम्ही मालवणला आलात तेव्हा नाट्यगृहासाठी 13 कोटी मंजूर झाले असे सांगितले मात्र त्या 13 कोटी तीन एकही रुपया अद्याप आला नाही त्याचे काय झाले यावरही तुम्ही बोलावे असा टोला आमदार निलेश राणे यांनी यानिमित्ताने लगावला.

दरम्यान मी सूर्यावर पोहचण्याचा प्रयत्न करत नाही मात्र एकूणच जे काय ग्रहण लागले आहे ते सुटले पाहिजे ही आपली भूमिका आहे असेही आमदार निलेश राणे म्हणाले.

मालवणच्या जनतेची सेवा करण्याची संधी शिवसेनेला द्या : आमदार निलेश राणे

मालवण शहर विकासाची जबाबदारी आमची

21 व्या शतकातील दर्जेदार मालवण शहर बनवणार

शांत, संयमी आणि स्वच्छ प्रतिमेचे शिवसेनेचे उमेदवार

मालवण कुडाळ मतदारसंघातील जनतेने आशीर्वाद देऊन मला आमदार केले. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत त्यांना अपेक्षित काम करतं आहे. आता 21 व्या शतकातील दर्जेदार असे मालवण शहर बनवणे हे माझे लक्ष असून मालवण शहराची सेवा करण्याची संधी जनतेने द्यावी. नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांसह सर्व शिवसेना उमेदवारांना बहुमतांनी विजयी करा. मालवण शहराच्या विकासाची जबाबदारी माझी असेल. असा ठाम विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

मालवण नगरपरिषद निवडणूक प्रचार सांगता होत असताना शिवसेना प्रचार कार्यालय येथे आमदार निलेश राणे यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महेश कांदळगांवकर, बाळा चिंदरकर, काका कुडाळकर आदी उपस्थित होते.

गेली अनेक वर्ष शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. हा विकास साध्य करायचा आहे. आदर्श असे मालवण शहर घडवायचे आहे. त्यासाठी स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार शिवसेनेने दिले आहेत. पारदर्शक कारभाराची शपथ त्यांनी घेतली आहे. ते निश्चितच पारदर्शक कारभार करतील. शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील असा शब्द आमदार निलेश राणे यांनी यानिमित्ताने दिला.

ओबीसी आणि मराठा समाजाची फसवणूक

भाजपा नगराध्यक्ष उमेदवार सौ शिल्पा खोत यांनी ओबीसी आणि मराठा समाज या दोघांचीही फसवणूक केली आहे. भंडारी समाजाकडून तर याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन्ही समाजावर अन्याय करण्याचे व फसवणूक करण्याचे काम भाजपा उमेदवार यांनी केले आहे. याचा उल्लेख पुन्हा एकदा निलेश राणे यांनी केला. जनता मतपेटीतून उत्तर देईल असेही आमदार निलेश आणि म्हणाले.

विकासाची जबाबदारी आमची

राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहराच्या विकासाची जबाबदारी आमची आहे. शहर विकासाची व्हिजन डॉक्युमेंट विकासाची अष्टसूत्री आम्ही तयार केली आहे. त्या माध्यमातून पुढील पाच वर्षात जनतेला अपेक्षित असे 21 व्या शतकातील मालवण शहर आम्ही निर्माण करू. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत शहरातील पदाधिकारी यांना सोबत घेऊन व जनतेच्या आशीर्वादाने विकास साध्य केला जाईल. असे आमदार निलेश राणे म्हणाले.

rapan bottom