जनतेला अपेक्षित प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच लक्ष
भाजपा नगरसेवक उमेदवार संतोष शिरगावकर, मरिना फर्नांडिस यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण : सर्वसामान्य जनतेशी जोडलेले संतोष शिरगावकर, मरिना फर्नांडिस हे उमेदवार भाजपने या प्रभागात दिले आहेत. जनतेचा पाठिंबाही त्यांना मिळतं आहे. प्रामुख्याने बाजारपेठ आणि दाटवस्तीचा विभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या या प्रभागातून भाजपच्या उमेदवारांना मिळत असलेला पाठिंबा पाहता भाजपा उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त होत आहे.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा यतीन खोत, नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष शिरगावकर व सौ. मरिना फर्नांडिस यांना प्रचार दरम्यान सर्वत्र जनतेतुन प्रतिसाद मिळतं असल्याचे चित्र आहे.
संतोष शिरगावकर यांना प्रभागाची चांगलीच ओळख असून त्यांना मानणारा मोठा वर्ग येथे आहे. जनतेची भक्कम साथ संतोष यांच्या बाजूने असल्याने प्रचार रॅलीमध्ये मिळत असलेला प्रतिसाद हा त्यांच्या विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा ठरत आहे. शांत संयमी आणि आपले वाटणारे असे हे नेतृत्व आहे. शिरगावकर आणि फर्नांडिस हे दोन्ही युवा चेहरे असल्याने मतदार त्यांच्यासाठी सातत्याने विजयाच्या शुभेच्छा देत आहेत, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले.
सौ. मरिना फर्नांडिस या याच प्रभागातील कन्या आणि सूनही आहेत. यामुळे प्रभागातील मतदारांसोबत त्या जोडल्या आहेत. ख्रिस्ती समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग महत्वाचा असतो. प्रभागात धार्मिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले असल्याने समाजातून त्यांना मोठा पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
भाजपा सरकारकडून यापूर्वीही किनारपट्टीवर मच्छीमारांच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले असून शासनाच्या विविध योजनांचा फायदा मच्छीमार व त्यांच्या कुटुंबियांना मिळत आहे. याहीपुढे शासनाच्या सर्व योजना प्रभागात राबवून विकसीत प्रभाग निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे उमेदवार संतोष शिरगावकर व मरिना फर्नांडिस यांनी सांगितले.

