Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

पुन्हा शिवसेना पुन्हा धनुष्यबाण ; शिवसेनेच्या नीना मुंबरकर नगरसेविका पदाच्या तिसऱ्या पर्वा साठी सज्ज!

पुन्हा शिवसेना पुन्हा धनुष्यबाण ; शिवसेनेच्या नीना मुंबरकर नगरसेविका पदाच्या तिसऱ्या पर्वा साठी सज्ज!

प्रभाग तीन मधून हक्काचे आणि प्रभागाची जाण असणारे महिला नेतृत्व

नगरसेवक उमेदवार दिपक पाटकर यांनाही मिळतोय जनतेचा मोठा पाठिंबा

मालवण नगरपरिषदेवर भगवा फडकणार

नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर व नगरसेवक उमेदवार बहुमतांनी विजयी होणार : व्यक्त केला जातोय विश्वास

मालवण : विकासाचे व्हिजन असणारे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण नगरपरिषदेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. मालवण शहरात शिवसेनेचा झंझावाती प्रचार सर्वत्र सुरु आहे. सर्वच ठिकाणी शिवसेना उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतं आहे.

यापूर्वी राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1996 आणि 2001 अश्या दोन टर्म शिवसेना नगरसेविका म्हणून सेवा कार्य बजावलेल्या नीना मुंबरकर या आता पुन्हा एकदा शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर नगरसेविका पदाची निवडणूक प्रभाग तीन मधून लढवत आहेत. जनतेच्या आशीर्वादाने नगरसेविका पदाच्या तिसऱ्या पर्वा साठी सज्ज.

प्रभागाची जाण असलेल्या आणि जनतेशी संपर्क आलेल्या नीना मुंबरकर यांनी याठिकाणी शिवसेना नगरसेवक उमेदवार दिपक पाटकर यांच्या सोबतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. सोबतच शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर यांनाही या प्रभागातून मोठे मताधिक्य देण्यासाठी नीना मुंबरकर आणि दीपक पाटकर हे दोघेही शिवसेनेचे उमेदवार सज्ज झाले आहेत.

नीना मुंबरकर यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे पुर्ण केली. त्यात प्रामुख्याने आडारी रेवतळे जोडणारा रस्ता पूल हे काम राणे साहेबांच्या मोठया सहकार्यातून 1997 साली पूर्ण झाले. नागरिकांची मोठी मागणी त्यावेळी पूर्ण झाली. आडारी कोरगावकर घर रस्ता, गणपती मंदिर मार्ग यासोबतच प्रभागातील अनेक विकास कामे नागरिकांच्या मागणीनुसार पूर्ण करण्यात आली.

नीना मुंबरकर यांनी केलेली विकास कामे व त्यांचा असलेला जनसंपर्क लक्षात घेता राणे साहेबांनी पुन्हा एकदा त्यांना नगरसेविकेची उमेदवारी दिली. एक हक्काचे नेतृत्व म्हणून प्रभागातील जनतेने त्यांना पुन्हा एकदा 2001 साली नगरसेविका म्हणून विजयी केले. नीना मुंबरकर यांच्या प्रचारात राणे साहेब, सौं. निलमताई सक्रियपणे सहभागी झाले होते. राणे साहेब यांच्या नेतृत्वात राजकारण समजकारण करतं असताना नीना मुंबरकर या जनतेशी जोडलेल्या राहिल्या.

राणे साहेबांनी त्यावेळी मालवण शहारासाठी धामापूर नळपाणी योजना आणली. मालवण शहाराची जलवाहिनी बनली. नीना मुंबरकर यांनी आपल्या प्रभागातील जनतेला याचा फायदा करून दिला. नीना मुंबरकर समाजकार्य करतं असताना लायन्स क्लब, बचत गट यांच्या माध्यमातून काम सुरु होते. तसेच प्रभागातील अनेक गरजू महिलांना शासकीय योजना फायदा त्यांनी मिळवून दिला.

आता तिसऱ्या पर्वासाठी नीना मुंबरकर आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात नगरसेविका म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांचा पक्ष शिवसेना आणि चिन्ह शिवसेना असे समीकरण आहे.

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील सहकारी नगरसेवक उमेदवारी दिपक पाटकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, जेष्ठ शिवसैनिक यशवंत गांवकर यांच्या बरोबरच इतर पदाधिकारी, नागरिक यांची भक्कम फळी प्रचारात सहभागी असल्याने शिवसेनेचा विजय निश्चित आहे.

सहकारी उमेदवार दिपक पाटकर यांचा तर या प्रभागात जनसंपर्क अधिक चांगला असून त्यांनी ही केलेल्या विकास कामामुळे आणि जनतेच्या आशीर्वादाने माझा विजय आणखी सोपा होईल. आणि हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अबाधित राहील. या प्रभागातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.ममता वराडकर यांना सुद्धा मोठे मताधिक्य मिळवून देणार. असा विश्वास नीना मुंबरकर यांनी व्यक्त केला.

rapan bottom