मालवण : मालवण तालुक्यातील निसर्गसंपन्न घुमडे गावातील श्री देवी घुमडाई देवीचा आज वार्षिक जत्रोत्सव संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
सकाळी 8 वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम. दुपारी 1 वाजल्यापासून महप्रसाद
संध्याकाळी 3 वाजल्यापासून ओटी भरणे. रात्री 11 वाजता पालखी व फटाक्याची आतशबाजी. रात्री 12 वा. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ घुमडे यांच्या वतीने करण्यात येत आहे. अध्यक्ष श्री. दत्ता सामंत, ग्रा. मं. घुमडे, श्री. मनमोहन राणे ग्रा. मं. मुंबई.

