मालवण | प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे रविवार 30 नोव्हेंबर रोजी मालवण दौऱ्यावर येत आहेत. टोपीवाला हायस्कुल पटांगण मालवण येथे सायंकाळी 3:30 वा. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभा होणार आहे.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह प्रमुख नेते पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
शिवसेनेना नगराध्यक्षा उमेदवार सौं. ममता वराडकर यांसह शिवसेना नगरसेवक उमेदवार वसंत गांवकर, देवयानी शिर्सेकर, महेश सारंग, पूजा मांजरेकर, दिपक पाटकर, नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पुनम चव्हण, विलास मुणगेकर, नंदिता वरवडेकर, सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर, नरेश हुले, मेघा गांवकर, राजन परुळेकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, प्रमिला मोरजे, सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर यांच्या प्रचारार्थ ही प्रचार सभा होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

