Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सर्वाना हेवा वाटेल असे मालवण शहर; आमदार निलेश राणे बनवतील : दत्ता सामंत

सर्वाना हेवा वाटेल असे मालवण शहर; आमदार निलेश राणे बनवतील : दत्ता सामंत

नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर यांसह सर्व शिवसेना नगरसेवकांना बहुमतांनी विजयी करा : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मालवण वासियांना आवाहन

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे हे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहेत. अभिमान वाटावे असे कार्य त्यांच्याकडून सुरु आहे. मोठया प्रमाणात विकासनिधी ते मतदारसंघात खेचून आणत आहेत. पुढील पाच वर्षातील मालवण शहाराच्या विकासाचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. त्यांच्या दुरदृष्टी नेतृत्वात मालवण शहर सर्वोत्तम असे आदर्श शहर बनेल. असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात विकासाचे व्हिजन ठेवून शिवसेना उमेदवार मालवण नगरपरिषद निवडणूक लढवत आहेत. सर्वाना हेवा वाटेल असे मालवण शहर बनवण्यासाठी आमदार निलेश राणे यांना साथ द्या. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले.

शिवसेनेचे सर्व उमेदवार हे श्री देव रामेश्वर, नारायण चरणी पारदर्शक कारभाराची शपथ घेऊन निवडणूक रिंगणात आहेत. अश्या प्रकारे निवडणुकी पूर्वी शपथ घेणारे हे राज्यातील पहिलेच उदाहरणं ठरले.

जनतेचाही शिवसेना उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळतं आहे.

शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौ. ममता वराडकर या स्वच्छ प्रतिमा, संवेदनशील नेतृत्व आहेत. सामाजिक आणि राजकीय कार्यात त्या नेहमीच लोकांशी जोडून, त्यांच्या अडचणी समजून आणि त्यांच्या सोबत उभं राहून काम करत आल्या आहेत. आदराने बोलणं, प्रत्येकाला मान–सन्मान देणं आणि प्रामाणिकपणे काम करणं ही ममता वराडकर यांची जन माणसातील ओळख आहे. शांतपणे, परंतु प्रभावीपणे काम करण्याची त्यांची पद्धत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहे. त्यामुळे त्यांचा विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. सर्वच प्रभागात उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहता नगराध्यक्षा उमेदवार ममता वराडकर तसेच शिवसेना नगरसेवक उमेदवार वसंत गांवकर, देवयानी शिर्सेकर, महेश सारंग, पूजा मांजरेकर, दिपक पाटकर, नीना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पुनम चव्हण, विलास मुणगेकर, नंदिता वरवडेकर, सहदेव बापार्डेकर, अश्विनी कांदळकर, नरेश हुले, मेघा गांवकर, राजन परुळेकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, प्रमिला मोरजे, सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर हे नगरसेवक उमेदवार बहुमतांनी विजयी होतील असा दावा केला जात आहे.

rapan bottom