प्रभाग हे माझे कुटुंब ; जनतेची सेवा व प्रभागचा विकास करण्यासाठी कटीबद्ध : नगरसेवक उमेदवार यतीन खोत
नगराध्यक्षा उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत, नगरसेवक उमेदवार यतीन खोत, नगरसेविका उमेदवार सौं. महानंदा खानोलकर यांच्या वतीने घरोघर प्रचार
मालवण : मालवण नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने उत्स्फूर्त असा प्रचार सर्वच प्रभागात केला जात आहे. माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांचा हक्काचा प्रभाग असलेल्या प्रभाग पाच मध्ये श्री दत्त मंदिर व परिसरातील देवातांचे आशीर्वाद घेऊन भाजपा नगराध्यक्षा उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत, नगरसेवक उमेदवार यतीन खोत, नगरसेविका उमेदवार सौं. महानंदा खानोलकर यांच्या वतीने घरोघर प्रचार करण्यात आला.

प्रभाग हे माझे कुटुंब आहे. असेच मानून मी जनतेची सेवा करण्याचा व प्रभागचा विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्नाशील राहिलो आहे. यापुढेही प्रभागचा सर्वांगीण विकास भाजपाच्या माध्यमातून करून आदर्श असा प्रभाग बनवणे हेच लक्ष राहील. असे खोत यांनी सांगितले.

नगराध्यक्षा उमेदवार सौ. शिल्पा खोत यांना या प्रभागातून मोठे मताधिक्य देईल. आम्ही सदैव प्रभागातील जनतेचे ऋणी आहोत आणि ऋणी राहू. अश्या भावना यतीन खोत, शिल्पा खोत यांनी व्यक्त केला. यावेळी नागरिकांची मोठी उपास्थिती होती.


