Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

भरदिवसा वस्तीत घुसला बिबट्या !

भरदिवसा वस्तीत घुसला बिबट्या !

आचरा सिमांबा रामेश्वर सोसायटीत परिसरात खळबळ

आचरा : आचरा सिमांबा येथील रामेश्वर विकास सोसायट्या आवारात शुक्रवारी भर दुपारी बिबट्या घुसल्याने येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले. ग्रामस्थांची चाहूल लागताच बिबट्याने नितिन कृष्णा गावकर यांच्या घराच्या परीसरात झेप घेऊन अंगणात दाखल होत बाजूच्या जंगलमय परिसरच्या दिशेने निघून गेला.

बिबटया निघून गेल्याने ग्रामस्थांमधून सुटकेचा निःश्वास सोडला आला. दुपारी जेवण आटोपून आपल्या घराच्या गॅलरीत बसलेल्या अनुष्का मुननकर हिच्या नजरेत सोसायटीच्या मुख्य रस्त्याने चालत जाणारा बिबट्या पडताच त्यांनी सासरे गणपत मुननकर यांना सांगितले. याच दरम्यान विरुद्ध बाजूने येणा-या मोटारसायकल च्या आवाजाने बिबट्याने वाट सोडून नितीन गावकर यांच्या घराच्या आवारात उडी घेत अंगणात उतरला होता. घरात भाड्याने राहणाऱ्या राठोड कुटूंबीयांनी बिबटया समोर असल्याचे बघून तात्काळ घराचे दरवाजे बंद करून घेतले. भर दिवसा सोसायटीच्या आवारात बिबट्या घुसला असल्याचे रहिवाशांनी पत्रकार परेश सावंत यांना संपर्क करत याबाबत वनविभागास खबर देण्यात सांगितले त्यानंतर सावंत यांनी वन विभागाला संपर्क करत घटनेची माहिती दिली.

वनविभागाची टीम आचरा येथे दाखल झाली होती. घराच्या परीसरात बिबट्या च्या पायाचे ठसे उमटलेले दिसून येत होते. बिबटयाची खबर कळताच आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, सचिन गावकर, गिरीश घाडी उदय बापर्डेकर यांनी भेट दिली होती. यावेळी सोसायटीचे अन्य रहिवासी उपस्थित होते.

rapan bottom