उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार अधिक वेळ
मुंबई : राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका आहेत. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत रविवार 30 नोव्हेंबर पर्यंत होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार ही मुदत एक डिसेंबर रात्री दहा वाजेपर्यंत करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पत्र निवडणूक असलेल्या नगरपरिषद नगरपंचायतना प्राप्त झाले आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
नव्या आदेश नुसार 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल. या वेळेपासून सभा मोर्चे ध्वनिक्षेपक याचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी प्रसारण सर्व बंद होईल. असे आदेशात म्हटले आहे.
एकूणच ही मुदत वाढ मिळाल्यामुळे प्रचार करताना उमेदवारांना अधिकचा वेळ मिळणार आहे.
▪️अमित खोत | मालवण

